
पालघर – पालघरच्या आदिवासी भागात ५० ते ८० हजारांत, मुलींच्या विक्रीचा बाजार होत आहे. पालघर जिह्यातील एजंटकडून हजारो रूपये देऊन आदिवासी भागातील लहान मुलींचा सौदा होत आहे, व आदिवासी लहान मुलींच्या आई वडिलांची मोठी फसवणुक होत आहे अशी माहिती मिळाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात लहान मुलींच्या विक्रीचा बाजार भरत आहे. ५० ते ८० हजारांत लहान मुलींची सौदाबाजी होत आहे. महाराष्ट्रातील एक भयाण वास्तव सांगणारी ही माहिती मिळाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात लहान मुलींच्या विक्रीचा बाजार भरत आहे, तर ५० ते ८० हजारांत मुली विकल्या जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचा नाव गाजत असलेल्या महाराष्ट्रात आतमध्ये काय चालले आहे, याची कल्पना बहुतेक कुणाला नाही. महाराष्ट्राच्या समाजमनाला हादरवून टाकणारी माहिती जगासमोर आली आहे. महाराष्ट्रातील एक भयाण वास्तव सांगणारी ही माहिती आहे.
एका व्यक्तीच्या हातातील पैशातून काही जमीन किंवा कुठल्या वस्तूच्या खरेदी केली जाते. परंतु एका १४ वर्षीय मुलीच्या सौद्यासाठी हजारो रूपये दिले जात आहेत. खेळायच्या, बागडायच्या आणि शाळेत जायच्या दिवसात या लहान मुलींना चक्क काही हजारात विकत घेतले जात आहे, हे अंगावर शहारे आणणारे वास्तव आहे. पालघर जिल्ह्यात या अल्पवयीन मुलीची खरेदी केली जात आहे. यामागचे कारणही तेवढेच धक्कादायक आहे. राज्यात व देशात ही सध्या लग्नासाठी मुलांना मुली भेटत नाहीत, तर खासगी नोकरी करणारे तरूण यांना ही लग्नाला मूलगी भेटत नाही. तर राज्यातील काही मूलांचे सहजासहजी लग्न होत नाही, एकतर मुलगा सरकारी नोकरीला हवा किंवा खासगी कंपनीत. त्याचं पॅकेज १५ किंवा २० लाखांचे हवे. मात्र, नोकरी नसलेल्या तरूणांनी काय करायचं? त्यांची लग्न कशी व्हायचीत? त्यासाठी काही एजंट राज्यातील पालघर जिल्हयाच्या आदिवासी भागात अॅक्टिव्ह आहेत. जे नवरामुलाकडून लाखो रूपये घेतात आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुटुंबाना केवळ हजारो रूपये देऊन त्यांच्या मुलींचा सौदा करत आहेत. तुमच्या मुली सुखात संसार करतील, मुलगा नोकरी करतो अशी आमिषे दाखवून अशिक्षित वाड्या-वस्त्यावरील आदिवासी कुटुंबाची सऱार्सपणे फसवणूक केली जात आहे.
पालघर जिल्हयातील आदिवासी पाड्यांवर लहाना मुलींची लग्नासाठी विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. पालघरमधील आदिवासी भागात असे प्रकार घडू लागले आहेत. आदिवासी भागात ५० हजार ते ८० हजारांत या लहान मुलीची विक्री होत आहे. पालघरमधील पीडित मुलींना याची कल्पनाही नाही. बेसावध क्षणी मूलींचे लग्न लावून दिले जात आहे. आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहील, जे सुख आपण आर्थिक परिस्थितीमुळे देऊ शकलो नाही ते लग्नानंतर मिळेल या भ्रमात राहून पालघरमधील आदिवासी आई वडील एजंटच्या अमिषाला बळी पडत आहेत. पण त्यांना काय माहिती, मिळालेल्या पैशांच्या बदल्यात त्यांच्या चिमुकलीच्या नशिबात फक्त आणि फक्त छळच लिहिलेला आहे. जव्हार तालुक्यात एका आदिवासी कुटुंबासोबत असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. १४ वर्षाची मूलगी एका एजंटमार्फत जळगावच्या सचिन पाटीलसोबत त्र्यंबकेश्वरमध्ये तिचे लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर मूलगी गरोदर राहिली. मात्र, तिच्या सासरच्यांनी गर्भपात करून मूलीला तिच्या माहेरी पाठवून दिले.
पालघरच्या आदिवासी भागात एजंटमार्फत अनेक मुलींचा सौदा केला जातो. एजंट लाखो रूपये घेऊन आदिवासी समाजातील मुलींची लग्न लावून देतात. मात्र, नंतर त्यांचं काय होतं? त्या कशा राहतात याकडे ढुंकूनही बघत नाहीत. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागातील भीषण परिस्थितीमुळे इथली कुटुंबे आपल्या मुलींची केवळ ४० ते ५० हजारांसाठी लग्न लावून देतात. आपली मुलगी कोणाला देतोय? तो कुठे राहतो? याची साधी कल्पना देखील त्यांना नसते. या प्रकरणात पालघर पोलिसांनी कारवाई केली असून, चार्जशीट दाखल केली आहे. आरोपींसह एजंटलाही पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.
मात्र, आदिवासीबहुल या भागातल्या वाडा, मोखाडा, जव्हार, भिवंडीत अशी अनेक प्रकरणे आहेत. ज्यात अल्पवयीन मुलींची लग्न करून त्यांचा सौदा केला जातोय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिसरात पालघर आणि ठाण्याचा आदिवासी भाग आहे. या आदिवासी भागाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पालघरमध्ये बालमृत्यू आणि कुपोषण इथल्या आदिवासींच्या पाचवीला पुजले आहे. आईच्या पोटात असल्यापासून इथल्या आदिवासींच्या वाट्याला संघर्ष येतो आहे. जन्मताच जगण्याचा संघर्ष आहे. तिथंही मृत्यूला हुलकावणी दिली की कुपोषणाचा विळखा पडतोआहे. त्यावरही मात केली की इथल्या आदिवासी मुलींचा चक्क सौदा मांडला जात आहे. असे वास्तव पालघरमध्ये आहे. पालघरमध्ये काही एजंट लोक आदिवासी भागातील लोकांची फसवणुक करित आहेत, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे ,असे येथील काही सामाजिक संस्था व स्थानिक ग्रामस्थांनी म्हटले आहे.





