शिष्यवृत्ती ही वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले…

SHARE:

मुंबई – शिष्यवृत्ती ही वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. या राज्यात कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ व कोणता अभ्यास ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही, व अजित पवारांना हे ठरवण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. एकाच परिवारातील ५-५  जण पीएचडी करायला लागले, असे अजित पवार म्हणाले होते, त्या वक्तव्यावर आता रामदास आठवलेंनी अजित दादाला प्रत्युत्तर दिले आहे, रामदास आठवले म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका, असा इशारा रामदास आठवले यांनी अजित पवारांना दिला आहे. या देशात व राज्यात कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही, आणि अजित पवारांना हा अधिकार कोणी दिला नाही, असेही रामदास आठवलेंनी म्हटले आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत केलेले वक्तव्य चांगलंच चर्चेत आले आहे. सध्या पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांवर अवाढव्य खर्च होत आहे. “मी मध्यंतरी माहिती घेतली असता, ठराविक विद्यार्थ्यांवरच कोटी रुपये खर्च होत आहेत. संस्थेचा जवळपास ५० टक्के निधी केवळ पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर जात असल्याने बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ४२-४५  हजार रुपये महिना मिळतो म्हटल्यावर एकाच घरात ५-५  लोक पीएचडीला प्रवेश घेत आहेत. विषय निवडतानाही प्रश्न पडतो की, नक्की कोणत्या संशोधनासाठी लाभ द्यायचा“, असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते, त्यांच्या या वक्तव्यावरती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.

या देशात शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. रामदास आठवले यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत म्हटले आहे की, शिव फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान आम्ही आहोत. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की, शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे या देशात व राज्यात शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही; ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, असे रामदास आठवले आहे. राज्यात व देशातील मूलांसाठी कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार अजित पवार वा इतर कोणालाही नाही, तो घटनात्मक अधिकार आहे, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवलेंनी म्हटले आहे की, जर एकाच कुटुंबातील पाच विद्यार्थी पीएचडीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यावर शंका घेण्याऐवजी समाजाने आणि शासनाने अभिमान व्यक्त केला पाहिजे. ही परिस्थिती म्हणजेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्षात उतरलेला विजय आहे. या देशात आत्मसन्मान, समता आणि संविधानाने दिलेला हक्क जपण्यासाठी आहे. कोणतेही शिक्षण कमी जास्त नसते. प्रत्येक विषय, प्रत्येक अभ्यासक्रम आणि प्रत्येक ज्ञानशाखा समाजासाठी तितकीच महत्त्वाची असते. कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.

देशात आज वंचित समाजातील विद्यार्थी पीएचडी, संशोधन आणि परदेशी शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत, हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे. देशात व राज्यात गैरप्रकार होत असतील तर कारवाई करा; पण देशातील व राज्यातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका, असा इशारा रामदास आठवलेंनी दिला आहे.देशातील व राज्यातील विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही“, असा इशाराही रामदास आठवलेंनी राज्यातील भाजपा सरकारला दिला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा