देशातील शाळकरी मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले, 10 शहरांतील सर्वेक्षणातील वास्तव समोर…

SHARE:

नवी दिल्ली – देशातील शाळकरी मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे, तर भारतातील १०  शहरांतील सर्वेक्षणातील वास्तव आता समोर आले आहे. देशात अवघ्या १३व्या वर्षी शाळकरी मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात होत आहे. देशातील प्रमुख दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघडकीस आले आहे. देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अमली पदार्थांचे व्यसन सरासरी १३व्या वर्षीच सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील १०  प्रमुख शहरांतील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

अभ्यासानुसार, इयत्ता ८,९,११  व १२  वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर मुलांनी लहान वयातच व्यसनांचा अनुभव घेतल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण 5,920 विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अंमली पदार्थांच्या वापराची सरासरी सुरुवातीची वयोमर्यादा १२.९  वर्षे असल्याचे नोंदले गेले आहे.
विशेष म्हणजे, श्वसनाद्वारे घेतले जाणारे अंमली पदार्थ वापरण्याचे वय सर्वात कमी असून ते सरासरी ११.३  वर्षे असल्याचे आढळले आहे. त्यानंतर हेरॉइन १२.३  वर्षे आणि वैद्यकीय औषधांचा गैरवापर १२.५  वर्षे यांचा क्रम लागतो. तंबाखू आणि मद्यपान हे सर्वाधिक वापरले जाणारे पदार्थ असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५  टक्कयांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसनांचा वापर केल्याचे मान्य केले आहे, तर 10.3 टक्के विद्यार्थ्यांनी मागील एका वर्षात आणि ७.२  टक्के विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात अशा पदार्थांचा वापर केल्याचे सांगितले आहे.

देशातील प्रमुख दहा शहरांतील जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी तंबाखू सहज उपलब्ध असल्याचे, तर ३६  टक्के विद्यार्थ्यांनी मद्य सहज मिळत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे अल्पवयीन मुलांपर्यंत व्यसनाधीन पदार्थ सहज पोहोचत असल्यामूळे अल्पवयीन मूलांच्या सुरक्षितता व मानसिक स्थिती व आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे ९५  टक्के विद्यार्थ्यांना व्यसन हानिकारक असल्याची जाणीव असूनही त्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून आले आहे. देशभरातील प्रमुख शहरात व ग्रामीण भागात ही मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण अधिक असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

अर्थात शहरी भागात मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात धुम्रपान व मद्यपानाची सवय असल्याचे दिसून आली आहे. गंभीर बाब म्हणजे देशातील शासनाने शाळांच्या शंभर मीटर परिसरात पान तंबाखूची दुकाने असू नयेत, असे आदेश काढले असले तरी, अनेक राज्यांतील पोलिसांकडूनही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही. देशात शालेय व महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे तर, अंमली पदार्थही उघडपणे मिळतात, अशी माहिती मिळाली आहे. देशभरात चरस गांजापासून विविध अमली पदार्थ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत असून, मोठ्या प्रमाणात देशातील तरुण पिढी व्यसनाकडे वळताना दिसत आहे.

भारत देशात केवळ जनजागृती नव्हे तर पालक, शाळा, समाज आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय, ही अंमली पदार्थ व व्यसनाधनतीची वाढती समस्या आटोक्यात येणार नाही, असा इशाराही भारतातील अभ्यासकांनी दिला आहे. भारत देशात अनेक राज्यात व देशातील प्रमुख्य मोठया शहरांमध्ये , महानगरांमध्ये व देशातील काही राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये तरूण मूलांमध्ये अंमली पदार्थाच्या व्यसनांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, यासाठी देशातील सरकारने ठोस प्रयत्न केले पाहिजेत ,असे भारतातील अभ्यासकांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा