बारामती तालुक्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

SHARE:

बारामती – तालुक्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ग्रामसेवकाचा मृत्यू झाला आहे. बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे. बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार गावाच्या हद्दीतून जाणार्या राज्य मार्गावर हा अपघात झाला आहे. बारामती तालुक्यातील जळगाव गावाच्या हद्दीत राज्य मार्गावर काल रात्री मोठा अपघात घडला आहे. रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे बारामती परिसरात संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. या प्रकरणी बारामतीतील प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या अपघातात मधुकर धोंडीबा जगताप रा. भिलारवाडी यांचा मृत्यू झाला आहे. ते बारामती तालुक्यातील मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री काम आटोपून ते आपल्या घरी परतत असताना जळगाव क.प. जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली आहे.

ही धडक इतकी जोरदार होती की, मधुकर जगताप यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. या राज्य मार्गावर अद्याप गतिरोधक बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच कारणांमूळे बारामतीतील संतप्त संतप्त नागरिकांनी जळगाव क.प. येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. काही काळ तणाव निर्माण झाला होता.

परंतु काही वेळानंतर बारामती प्रशासनाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आहे. अपघात झाल्यावर पळून गेलेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणात अधिक तपास बारामती पोलिस करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा