बारामतीत राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही निवडणूक लढायचा विचार करू; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच मोठं वक्तव्य

SHARE:

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार गट उमेदवार देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. यावरून कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि सुप्रिया सुळेंचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. बारामतीत राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही निवडणूक लढायचा विचार करू, असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही आग्रही आहे. मात्र काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. राहुरी आणि बारामती अशा दोन्ही जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस पक्ष निवडणूक लढविण्याचा विचार करेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार म्हणाले कि बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. ही त्यांची भूमिका असून याबाबत महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही. बारामती आणि राहूरीत राष्ट्रवादी पक्ष उमेदवार देण्यास तयार नसेल, तर काँग्रेस या जागा लढण्याचा विचार करेल! बारामतीत पोटनिवडणूक लढवण्यास शरद पवार गट तयार नसेल तर ती निवडणूक लढवण्याबबत काँग्रेस पक्ष विचार करेल यापूर्वी पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. बारामती राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती.

आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनीविरोधात कसा उमेदवार देणार. त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले दरम्यान, या घडामोडींमुळे बारामतीत तिहेरी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांना विधानपरिषदेवर पाठवावे आणि विधानसभा निवडणुकीत वेगळा उमेदवार द्यावा, इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा असेही हाके म्हणाले. या पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४  मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा