अल्पवयीन विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणात कुटुंबाला ७ वर्षांनी न्याय; संबंधित दोषी पोलीस अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल

SHARE:

संभाजीनगर – अल्पवयीन विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणात कुटुंबाला 7 वर्षांनी न्याय मिळाला आहे. संबंधित दोषी पोलीस अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये एका पीडितेकडे परवाना नसल्यामुळे अपघाताची जबाबदारी तिच्यावर टाकता येत नाही, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. संभाजीनगरमध्ये असा एक प्रकार घडला आहे.

संभाजीनगरमध्ये टाऊन हॉल उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात तिच्या कुटुंबाला ७  वर्षांनी न्याय मिळाला आहे. राज्यातील मोटार अपघात न्यायाधिकरणाने या प्रकरणात दोषींना २७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, ही रक्कम विमा कंपनी, वाहन मालक आणि चालक यांनी संयुक्तपणे अदा करावी, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी कुटुंबाला दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या घटनेची गंभीर दखल घेतली होती. संबंधित पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात अल्पवयीन विद्यार्थिनीचा आकेफा मेहरीन हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवत दोषारोप पत्रही सादर करण्यात आले आहे. याप्रकरणात ७  वर्षांनी दोषी पोलिस अधिकार्याला शिक्षा झाली आहे. या अपघात प्रकरणात एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबाला मृत्यूनंतर न्याय मिळाला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा