एसआयआर प्रक्रियेसाठी आलेल्या बीएलओला बेदम मारहाण; लाथा-बुक्क्यानी मारहाण करून आरोपींचा पळ, शोध सुरु

SHARE:

वाशिम – जिल्ह्यात एसआयआर प्रक्रियेसाठी आलेल्या बीएलओला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मतदार पडताळणी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात घडली आहे. या बीएलओ लाथा-बुक्कयांनी बेदम मारहाण केल्यानंतर आरोपी पळून गेले आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात २००२ आणि २०२४ च्या पुनर्मतदानाची प्रत्यक्ष पडताळणीसाठी गेलेल्या बीएलओ नवनाथ मुंढे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे.

राज्यातील निवडणूक आयोगाकडून मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. त्यासाठी, वाशिम प्रशासनातील कर्मचारी कामाला लागले आहेत. वाशिम जिल्ह्यात बीएलओद्वारे ही एसआयआर प्रक्रिया पुढे जात आहे. मात्र, राज्यातील मतदारांची प्रत्यक्ष पुनर्पडताळणी करणाऱ्या बीएलओवर वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात काही जणांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरात मतदार प्रत्यक्ष पुर्नपडताळणी मॅपिंगच्या कामासाठी गेलेल्या बीएलओवर हल्ल्याची घटना उघड झाली आहे.

या घटनेमुळे राज्यातील निवडणूक कामकाजाच्या पडताळणीबाबत बीएलओ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात पुनर्मतदानाची प्रत्यक्ष पडताळणीसाठी गेलेल्या बीएलओ नवनाथ मुंढे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. बीएलओ नवनाथ मुंढे यांना लाथा-बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमी बीएलओ नवनाथ मुंढेना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीएलओ नवनाथ मुंढे यांना गंभीर अवस्थेत वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या बीएलओ नवनाथ मुंढे यांच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेनंतर वाशिम जिल्ह्यात मतदार पडताळणी करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तीन अज्ञात हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी मतदार पडताळणी करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांनी केली आहे. रिसोड पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणात अधिक तपास रिसोड पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा