युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं; आनंद स्वरूप महाराज याने तोडले अकलेचे तारे

SHARE:

मुंबई – लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवणारा आणि आरएसएसचा प्रचारक पंडित धीरेंद्र शास्त्री याने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा नुकताच अवमान केला. ही घटना ताजी असताना आता आणखी एका साधूने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानच केला. आनंद स्वरूप आपल्या अकलेचे तारे तोडताना म्हणाले कि युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झाल. इतकेच नाही तर या जंताने पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ धीरेंद्र गर्ग या जंताच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन देखील केलं. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाचा विडाच त्यांनी उचललाय का, असा प्रश्न शिवप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.

पंडित धीरेंद्र गर्ग या जंताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर संपूर्ण राज्यात निषेध आंदोलनं केली जात आहे. काही ठिकाणी त्याचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे तर काही ठिकाणी त्यांच्या फोटोला शेण फासलं जात असून धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहे. या दरम्यान आनंद स्वरूप या जंताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानच केला नाही तर पंडित धीरेंद्र गर्ग या जंताच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन देखील केल. त्यांच्या या वक्तव्याची एक पोस्ट समाज माध्यमांत व्हायरल झाली आहे.

व्हायरल पोस्टमध्ये आनंद स्वरूप आपल्या अकलेचे तारे तोडताना म्हणतो कि युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही तर फक्त छापामार युद्ध लढले. पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली. धीरेंद्र शास्त्री जे बोलले त्याचं मी शब्दशः समर्थन करतो. त्यांनी माफी मागायची गरज नव्हती. अशा शब्दात स्वामी स्वरूपानंदने एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानच केला नाही तर पंडित धीरेंद्र गर्ग या जंताच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन देखल केलं आहे. हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढाईच्या बळावर निर्माण केेलेला खरा इतिहास खोटा ठरवण्याचा आणि पेशव्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा केविलवाना प्रयत्न दिसून येत आहे.
धीरेंद्र शास्त्री आणि आनंद स्वरूप यांसारख्या स्वयंघोषित जंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले आहे. शिवप्रेमी आणि विरोधकांनी या विधानांचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून, महाराष्ट्रात अशा भोंदूगिरीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी उर्फ नारायण ठोसर यांची कधीही भेट झाली नाही. इतकेच नाही तर इतिहासात याचा पुरावा देखील नाही. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते, असा निकाल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यानंतरही नुकतचं पंडित धीरेंद्र शास्त्रीने नागपुरातील एका आरएसएसच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माथी रामदासांना गुरू म्हणून बसवण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करताना धीरेंद्र शास्त्री म्हणाला कि छत्रपती शिवाजी महाराज अनेक लढाया लढून थकले होते. त्यानंतर ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी आपली सत्ता रामदास स्वामींना सोपवली. शिवराय म्हणाले की आता मला लढायचे नाही, हे मुकूट आणि सत्ता तुम्ही सांभाळा. यावेळी मंचावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी धीरेंद्र शास्त्रीला रोखालया हवं होतं, परंतू त्यांनी रोखलं नाही,
यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना आता आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रीच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करत एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानच केला आहे. आनंद स्वरूप याच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं असून धीरेंद्र शास्त्रीसह आनंद स्वरूप याच्यावर कारवाईच्या मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Comment