आरक्षणासाठी आरपारची लढाई: “जीवाला वेदना नकोत, आता एकदाचा तुकडा पडू दे!

SHARE:

जालना – सारखी उपोषणे करुन जीवाला वेदना होत आहेत एकदा तुकडा पडू देत, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात बाज टाकून उपोषणाला बसणार आहे. अन्न-पाणी घेणार नाही, उन्हात तडफडून मेलो तरी चालेल, असा राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. राज्यातील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 30 मे 2026 पासून आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्य सरकारला गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही. उन्हात आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल. मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यसरकारला 10 महिने वेळ दिल्याचे सांगितले आहे. माझा नाईलाज आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकराला, समाजाला आरक्षण मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

मी सीमारेषेवर आलेलो आहे, 30 मे 2026 ला आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. त्यात बदल केला आहे मला अंतिम टोकाचे आणि कठोर आमरण उपोषण करायचे आहे, रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे. ना कुठले पाणी, ना कुठले जेवण, ना पायात चप्पल घालणार, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत, या जीवाला तरसावे किती दिवस, जे काही होईल ते होईल, उष्माघाताचा बळी गेला तर चालेल मुख्यमंत्री फडणवीसांमुळे गेला, राज्य सरकारमुळे गेला, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

कितीही जीवाची लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला आहे, तर आपण आपली कदर का करायची, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या राज्यात आमरण उपोषण कुठेही होईल, यावर मी ठाम आहे. किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही हे ठरवले आहे. सारखी उपोषणे करुन जीवाला वेदना होत आहेत. एकदा तुकडा पडू देत, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल.

हे आंदोलन सुरु आहे त्याला 3 वर्ष झाले आहेत. मे महिन्याच्या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या राज्यात कुणबी मराठा मंत्रालय स्थापन करायला वेळ का लागतोय, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी सरकारला विचारला आहे. माझ्या समाजाच्या लेकरांना त्रास होतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आमरण उपोषण फायनल झाले आहे, यात बदल होणार नाही. मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे येऊ नये, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

देशात इतके टोकाचे आमरण उपोषण झाले असेल असे मला वाटत नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. राजकीय नेते येणार की नाही हे मला माहिती नाही. 29 ऑगस्ट 2025 पासून उद्या पर्यंत 10 महिन्याचा वेळ राज्य सरकारला दिला आहे. राज्यात हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? व्हॅलिडिटी देणार आहात का? राजकीय नेत्यांना मराठ्यांची मते पाहिजेत, मात्र, मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण दिले जात नाही. ही राज्य सरकारची आणि नेत्यांची दुटप्पी भूमिका आहे. तुम्हीच आमच्यावर हल्ले करायचे, आमच्या बांधवांवर 307 चा गुन्हा दाखल केला जातो.

मराठा आंदोलकांवरील राज्यातील गुन्हे मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलीस आमच्यावर हल्ले करणार त्यांच्यावर 120 ब लागून 307 दाखल करत नव्हता. सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितलेला, 10 महिने जीआर काढत नाहीत, अशी टीका मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केली आहे. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. या राज्यातील राजकीय नेत्यांना मराठ्यांची मते पाहिजेत, मात्र, मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण दिले जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment