प्रशासकीय वर्तुळात खळबळ: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी अटकेत

SHARE:

मध्य प्रदेश – मोरेना जिल्ह्यात तैनात असलेल्या एका उपजिल्हाधिकारीवर लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

मोरेना येथील 32 वर्षीय पीडित महिलेचा आरोप आहे की 2025 च्या सुरुवातीला तिची उपजिल्हाधिकारी अरविंद माहोर यांच्याशी फेसबुकद्वारे ओळख झाली. त्यावेळी ते संबलगढ येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) म्हणून कार्यरत होते. सोशल मीडियावर सुरू झालेले संभाषण हळूहळू भेटीगाठींमध्ये बदलले आणि दोघांमध्ये जवळीक वाढली.

महिलेचा आरोप आहे की अधिकाऱ्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. या विश्वासावर तिने संबंध ठेवले, परंतु नंतर आरोपीने पलटी मारली. तक्रारीनुसार, 30 मार्च 2025 रोजी, तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने मोरेना विश्रामगृहाच्या मागे घेऊन गेला. तिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर अधिकारी संबलगढ आणि ग्वाल्हेरमधील शासकीय निवासस्थानी तिचा अनेक वेळा शारीरिक छळ करण्यात आला. महिलेचा दावा आहे की हा प्रकार एक वर्षांपर्यंत सुरूच हेाता.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने अधिकार्यावर लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा त्याने लग्नाच्या बदल्यात आक्षेपार्ह अटी ठेवल्या, ज्यात पाच कोटी रुपये रोख मागणे आणि तिला एका महिन्यासाठी दुसऱ्या पुरुषासोबत पाठवणे यांचा समावेश होता. महिलेचा दावा आहे की तिच्या मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ आणि इतर पुरावे आहेत, जे तपास यंत्रणांना सादर केले जातील.

पीडितेने आरोप केला आहे कि जेव्हा तिने अधिकार्यावर लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा आरोपीने स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर तक्रार केल्यास महिलेच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही अधिकार्याने दिली. यानंतर, महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. या तक्रारीच्या आधारे, सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याने उपजिल्हाधिकारी अरविंद माहोर यांच्याविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी उपजिल्हाधिकारी अरविंद माहोर यांना अटक केली आहे. सध्या, पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात हजर केले आहे. तपास सुरू असून, तपासादरम्यान समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या तपासातून आणखी कोणते खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अरविंद माहोर यापूर्वीही अनेक वादांमध्ये अडकले आहेत. 2025 मध्ये, एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर रात्री उशिरा फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. यानंतर, पीडितेच्या कुटुंबीयांनी सार्वजनिक सुनावणीत तक्रार दाखल केली. त्याच वर्षी, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी चंबळ आयुक्तांना कथित गैरवर्तन आणि महिलांप्रति गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले होते.

माहोरचे नाव इतर वादांमध्येही समोर आले आहे. एका खाजगी हॉटेलमध्ये पार्किंगच्या वादातून त्याने कथितरित्या एका सुरक्षारक्षकाला कानशिलात लगावली होती, जी सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती. दरम्यान, सबलगढमध्ये एसडीएम म्हणून कार्यरत असताना, त्याने एका सार्वजनिक सुनावणीदरम्यान एका गावकऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आणि चापट मारल्याचा एक व्हीडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला होता.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment