सुखाचा शोध…!

SHARE:

सुखाचा शोध यावर सुंदर अशी लिहिलेली लेखक तन्मय गणेश पुनसे यांची कविता वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत…

 

सुखच शोधायचं तुले
घरातच शोध गड्या !
नको शेती माडी-वाडी
मावेल एवढ्या गाड्या !

भाकरीचं सुख पोळीत
दुर्मिळ कसं झालं वेड्या ?
फॅशनच्या दुनियेत कशा
वाटे साडी लुगडं बेड्या ?

धोतर बांडी, लुगडं चोळी
पेहरावात मराठ मोळ्या
माय रुखमा, बाप विठ्ठल
शोभे मस्त साध्या भोळ्या..

लेकरं-पाखरं,पुंडलीक
किती गोड त्याच्या खोड्या?
अंगती पंगती उठायच्या
जेवायच्या पैज होड्या..

मौज मजा दोस्ती मस्ती
फिटे हौस खेड्यापाड्या,
गिल्ली दांडू,चेंडू लगोरी
जत्रा-यात्रेत बैलगाड्या..

आंब्याच्या तं आमराईत
आबडुबली कोलाट उड्या,
शापी आंब्याच्या चवीनांदी
तीन चाकाच्या गुळगुड्या..

 

लेखक –
तन्मय गणेश पुनसे
मु. पळसखेड, जि.अमरावती.
संपर्क – ७४९८९०८२३६

तन्मय गणेश पुनसे
Author: तन्मय गणेश पुनसे

लेखक एक उत्कृष्ट व्याख्याते, लेखक, विद्रोहीकवी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड या गावी ते राहतात. अंधश्रद्धा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, भयकथा, शेतकऱ्यांच्या व्यथा इत्यादी विषयांवर लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. जेष्ट साहित्यिक प्रा. हरी नरके कथा पुरस्कार 2024 व अमरावती जिल्ह्याचा कविवर्य नारायण सुर्वे काव्यलेखन पुरस्कार 2026 ने ते सन्मानित आहे. मागील गेल्या वर्षभरापासून विविध समाज माध्यमांद्वारे आपले लिखाण करून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.

Leave a Comment