विदर्भ समाज कल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला चे संस्थापक व सचिव मा. विकासराव ठाकरे यांच्या जन्मदिनी विशेष कविता…

SHARE:

दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी असलेल्या विदर्भ समाज कल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला, ता. मोर्शीचे संस्थापक व सचिव मा. श्री. विकासराव ना. ठाकरे सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावरील साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची मुक्तछंदातील कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

मा. विकासराव ठाकरे सरांचे अभिष्टचिंतन

माननीय विकासराव ठाकरे
सरांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा ॥
आनंदी जीवनाच्या
मनस्वी सदिच्छा ॥

वाढदिवशी हा माझा
स्वीकारावा सन्मान
करद्वयांनी करितो
आपले अभिष्टचिंतन ॥

स्थापन केले आपण
मोर्शीला जिजामाता विद्यालय
व कनिष्ठ महाविद्यालय
आपल्या नेतृत्वाने
जिजामाता विद्यालयाचा
वृद्धिंगत झाला मान

सामाजिक आणि शैक्षणिक
कार्य आपण केले
नावाप्रमाणेच शाळेचे
नाव विकसित झाले

जिजामाता विद्यालयात
पाचवी ते बारावीच्या
संस्कारांची आपण रचली
सुंदर विद्येची बाग

विकासरावजी आपल्या
खंबीर नेतृत्वामुळे
जिजामाता विद्यालयाच्या
प्रगतीला आला वेग

डॉ. पंजाबराव उपाख्य
भाऊसाहेब देशमुख यांच्या
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे
आपण माजी प्राचार्य

विदर्भ समाज कल्याण व
बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे
सचिव म्हणून करीत आहात
आज शाळा विकास कार्य

मोर्शीच्या जिजामाता
विद्यालय व कनिष्ठ
महाविद्यालयाला
लाभले आपले मार्गदर्शन

विविध प्रकल्प आणि
उपक्रम राबवून
जिजामाता विद्यालयाचा
नावाप्रमाणेच केला विकास

विद्यार्थ्यांना दाखविता
उज्ज्वल यशाचा मार्ग
जागविता तयांचा नेहमीच
आदर्श विद्यार्थी धर्म

प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई
सरांच्या माध्यमातून
आपण जिजामाता शाळा
स्वच्छ आणि सुंदर केली
शिक्षक आणि विद्यार्थी
सर्वच आनंदात न्हाली

आपल्या मार्गदर्शनाने लाभला
जिजामाता विद्यालयाला
संवेदनशीलता,शिस्त आणि
वात्सल्याचा त्रिवेणी संगम

माननीय सचिव साहेब
श्री विकासराव ठाकरे
सरांचे वाढदिवशी
करितो अभिष्टचिंतन

आनंदाचा आज आला क्षण
वाढदिवशी आनंदले मन
विकासरावांचे करितो
मनस्वी अभिनंदन

वाढदिवसाच्या या पवित्र क्षणी
गाऊ विकासरावांची गोड गाणी
उदंड आयुष्याची आणि
निरामय आरोग्याची
हार्दिक शुभेच्छा वाणी ॥

शुभेच्छुक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
साहित्यिक तथा कवी, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा