गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई : वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला करून गंभीर दुखापत करणारा आरोपी अटकेत, ५ गुन्हे उघडकीस

SHARE:

नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८२ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरी जाऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद केले आहे.

घटनेची पार्श्वभूमी :

दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सदर परिसरातील फिर्यादी हिल्डा ॲलेक्झांडर ॲन्थोनी (वय ८२) यांच्या घरी एका अनोळखी इसमाने दरवाजाची बेल वाजवून दार उघडताच तोंडावर कापड बांधलेल्या त्या इसमाने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले होते.

तपास व उघड झालेले गुन्हे :

गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी क्लेमेंट उर्फ रोहीत युजीन पिल्ले (वय ३५, रा. मानकापूर, नागपूर) यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून पोलीस ठाणे सदर येथील चोरी, मानकापूरमधील घरफोडी, तसेच गिट्टीखदान हद्दीतील जबरी चोरी व विनयभंगाचे गुन्हे असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर सर्व यशस्वी कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त श्री. नविनचंद्र रेड्डी यांच्यासह संबंधित परिमंडळाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा