मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी अस्वच्छता केल्यास, महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई होणार

SHARE:

मुंबई – सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी अस्वच्छता केल्यास महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई होणार आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे. आता राज्यातील मुंबई शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजारपर्यत दंड आकारला जाणार आहे. मुंबई शहरातील स्वच्छता नियमांचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे, यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने आदेश दिले आहेत.

महानगरपालिकेकडून मुंबई शहरात व उपनगरात घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये मुंबई शहरातील उपनगरातील मुंबई महानगरपालिका परिसरातील कचरा निर्माण करणारे घटक, विविध आस्थापना, कचराविषयक सेवा प्रदाता, घनकचरा व्यवस्थापन, साठवणूक, वितरण व प्रक्रिया, या बाबत स्वच्छताविषयक शासकीय नियमांचे काटेकोर पालन होणार आहे. मुंबई शहरातील व उपनगर परिसरातील स्थानिक नागरिक किंवा मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी संस्था, व खासगी कंपनी यासंदर्भातील नवीन महापालिका नियमांचे उल्लंघन केल्ल्यास, संबंधित खासगी संस्था व स्थानिक नागरिक यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिका नियमांच्या अंतर्गत, मुंबई शहरात व उपनगरा सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५० रूपये, कचरा टाकल्यास ५०० रूपये, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २०० रूपये, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास २५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका आयुक्त व उपायुक्त यांच्या देखरेखीखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबई शहरात व उपनगरात स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांसाठी नवीन कडक नियम बनवले आहेत.

मुंबईत नागरी घनकचर्याची साठवणूक आणि वितरण, उत्पादक, महानगरपालिका प्रशासन, प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांची जबाबदारी व कर्तव्ये, वस्तू पुनर्प्राप्ती सुविधा, घनकचरा, जैव-वैद्यकीय कचरा, ई-कचरा, बांधकाम व पाडकाम राडारोडा, प्लास्टिक कचरा यासंदर्भात कडक नियमांची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई शहरातील विविध खासगी संस्था व स्थानिक नागरिक या सर्वांनी महापालिका नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा