मुंबई – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमानाचा १०० टक्के घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे. यानंतर आता विमान अपघातात अजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा सनसनाटी आरोप केला आहे. हा अपघात नाही तर घातपातच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्रॉफिक असते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित दादांच्या विमानाचा अपघात नाही तर १०० टक्के घातपातच असल्याचा दावा करून अनेक प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता विमान अपघातात आजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या एअर होस्टेस पिंकी माळी यांच्या वडिलांनी देखिल हा विमान अपघात नाही तर घातपातच असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी म्हणाले कि मला पाहिल्यापासूनच वाटत होतं गडबड आहे, एवढ्या सकाळी कधी वाहतूक कोंडी असते का? मग पायलट कसा वाहतुकीत अडकला? अचानक पायलट का बदलला? यात नक्की काही तरी वेगळे आहे. याची चौकशी झाली पाहिजे आम्हला न्याय पाहिजे, अशी मागणी पिंकीच्या वडिलांनी केली. त्यांनी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांसी सहमती दर्शवली. अनेक गोष्टींची उत्तरे अजून मिळाली माहीत ,हळूहळू सत्य बाहेर येतय. ज्या गतीने तपास झाला पाहिजे तसा होताना दिसत नाही, अशी खंत पिंकीच्या वडिलांनी व्यक्त केली.
पायलेट का बदलला?, अजित पवार यांच्यासोबत फक्त बॉडीगार्ड होता की कोणीही पीएसुद्धा होता? विमान हवेतच उलटे सुलट कसं झालं? असे अनेक संशय त्यांनी उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीला बँन केले असताना भारत सरकारने याची दखल का नाही घेतली? असा प्रश्न शिवम माळी यांनी उपस्थित केला. माझी मुलगी अपघाताने गेली की घातपाताने गेली हे आम्हला कळले पाहिजे. सत्य जाणून घ्यायचा आम्हाला अधिकार आहे, असेही ते म्हणाले. राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं. या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर अनेकजण अडचणीत येतील असा खळबळजनक दावाही शिवम माळी यांनी केला.
शिवम माळी म्हणाले कि रोहित पवारांनी जी शंका व्यक्त केली ते पाहता हा घातपात असू शकतो असा संशय आम्हाला आहे. रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी व्यक्त केलेल्या संशयावर तपास झाला पाहिजे. या अपघातात आम्हीही मुलगी गमावली आहे, त्यामुळे या अपघाताचं नेमकं कारण आम्हाला समजलं पाहिजे. जी व्हीएसआर कंपनी आहे, त्याचे अधिकारी आम्हाला याबद्दल काहीही माहिती देत नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
शिवकुमार माळी यांनीपिंकीला आदल्या रात्री काहीतरी सांगायचे होते, असे बोलत घातपाताचा संशय गडद केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांचे प्रत्येकवेळी काळ्या रंगाचे विमान असायचे. मात्र, यावेळी अचानक विमान बदलून पांढरे विमान का आणण्यात आले? असा गंभीर सवालही उपस्थित केला. अपघातात मृत्यू पावलेल्या पायलटचा ५० कोटी रुपयांचा विमा का काढण्यात आला होता? असा सवालही शिवकुमार माळी यांनी उपस्थित केला.





