ठाण्यामध्ये महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा हत्या

SHARE:

ठाणे – उल्हासनगर महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच सफाई कामगाराच्या पत्नीनेही आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ठाण्यातील उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. महादू जगताप असे मयत सफाई कामगाराचे नाव आहे.

उल्हासनगर महापालिकेने ठेका दिलेल्या कोणार्क कंपनीकडे तो सफाई कामगार काम होता. या घटनेनंतर पतीच्या हत्येची माहिती मिळताच सफाई कामगाराची पत्नी पूर्वी महादू जगताप यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

महादू जगताप हे उल्हासनगर कॅम्प ३ मधील सेक्शन २० परिसरात साफसफाईचे काम करत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात महादू जगताप यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर पळून गेला आहे. उल्हासनगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. उल्हासनगर सफाई कामगारांवर हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

या घटनेमुळे महापालिकेच्या सफाई कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ठाण्यामध्ये सफाई कामगाराची हत्या झाल्याने राज्यातील महापालिकांच्या सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. या घटनेनंतर महापालिकेतील सफाई कामगार व ठाण्यातील स्थानिक नागरिकांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात अधिक तपास उल्हासनगर पोलिस करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा