पुण्यात २ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात एसीबीकडून पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

SHARE:

पुणे – बंडगार्डन येथे २ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात एसीबीकडून पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात एका व्यक्तीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर रा. वानवडी यांच्याकडे होती. या चौकशीत तक्रारदाराला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. पोलिस अधिकार्याने लाच मागितल्या कारणाने तक्रारदाराकडून ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे एसीबी विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.

एसीबीने या तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या पडताळणी केली होती. या पडताळणीत पोलिस अधिकारी खेडकर यांनी स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसाठी म्हणून १ लाखाची तडजोड केली होती. आणि १ लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. पुण्यातील लाच प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचेही नाव आल्याने खळबळ उडाली आहे. एसीबी विभागाच्या पडताळणीत पोलिस अधिकारी खेडकर यांनी केवळ स्वतःसाठीच नाही, तर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसाठी पैसे मागितले असल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तडजोडी अंती १ लाख रुपये मागितल्याची माहिती मिळाल्यावर पुण्यात एसीबीकडून पुण्यातील बंडगार्डनचे पोलिस अधिकारी संदीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लाच प्रकरणात आणखी कोणाचे राजकीय संबंध आहेत का? हे तपासले जाणार आहे. पुण्यातील या लाच प्रकरणात अधिक तपास पुणे एसीबी विभाग करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा