मुंबईमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई; शिधावाटप विभागाची मोठी कार्यवाही

SHARE:

मुंबई – वरळी मध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करण्यात आली आहे. शिधावाटप विभागाच्या कारवाईत मुंबईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघडकीस आला आहे. मुंबईतील वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

मुंबई शहरातील रहिवासी भागात धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवून काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मुंबईतील वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील सूरज वल्लभदास चाळ परिसरात गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून मोठ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

त्यानुसार मुंबईतील पथकाने धाड टाकली आहे. बेकायदेशीररित्या साठा केलेले सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या कडक कारवाईत एचपी गॅस कंपनीचे ५  किलोचे ६  भरलेले आणि 58 रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच सुपर गॅस कंपनीचे ४  किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय १२, ४ आणि २  किलोचे विविध आकाराचे २५ रिकामे सिलिंडरही जप्त केले आहेत. हे सिलिंडर बेकायदेशीररीत्या काळ्या बाजारात विकण्यासाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मुंबई शहरात जप्त करण्यात आलेला सर्व घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा फौजदारी कारवाईसाठी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे. मुंबईतील रहिवासी भागात अशा प्रकारे बेकायदेशीर सिलिंडर साठवणे आणि त्यांची बेकायदेशीर विक्री करणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे शिधावाटप विभाग प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबईतील शिधावाटप विभागाचे अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणार्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा बेकायदेशीर प्रकारांना थांबवण्यासाठी शिधावाटप विभागाचे पथक सतर्क आहेत, असे मुंबईतील शिधावाटप विभाग प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा