आंध्रप्रदेश राज्यात ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात डीआरआयची कडक कारवाई, ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

SHARE:

आंध्रप्रदेश – राज्यात ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात डीआरआयने कडक कारवाई केली आहे, या कारवाईत आंध्रप्रदेश राज्यामध्ये ४७  कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, आणि या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश राज्यामध्ये डीआरआयने सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात कडक कारवाई केली आहे. आंध्रप्रदेश राज्यातील एनटीआर जिल्ह्यातील कोंडापल्ली औद्योगिक विकास क्षेत्रात एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ अल्प्राझोलमचे उत्पादन करणाऱ्या एका सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात डीआरआयने धाड टाकली आहे.

आंध्रप्रदेश राज्यातील गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवर आधारे ऑपरेशन व्हाईट हॅमर ही मोहिम राबवण्यात आली आहे. ११ आणि १२ मार्च २०२६ रोजी ही मोहिम राबवण्यात आली आहे, ज्यातून रासायनिक उत्पादन युनिटच्या नावाखाली कार्यरत असलेला अल्प्राझोलमच्या उत्पादनाचा एक पूर्ण विकसित औद्योगिक सेटअप उघडकीस आला आहे. कोंडापल्ली औद्योगिक विकास क्षेत्रातील परिसरात झडती घेण्यात आली आहे. २३७ किलो अल्प्राझोलम जप्त करण्यात आले आहे.

ज्याचे बाजारमूल्य ४७ कोटी रुपये आहे. तसेच ८०० किलोहून अधिक प्रमुख कच्चा माल, २८६० लिटर विविध रसायने आणि रिअॅक्टर, ड्रायर आणि सेंट्रीफ्यूज सारखी औद्योगिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. हा एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. मोठ्या प्रमाणात सिंथेटिक ड्रग्जचे बेकायदेशीर उत्पादन केल्याचे दिसून आले आहे. रसायन आणि औषधनिर्माण क्षेत्रात 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या एका औषध विक्रेत्याने हैदराबादमध्ये कच्चा माल आणि वितरण व्यवस्था करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्याची मदत घेतली होती.

आरोपीने अल्प्राझोलमचे गुप्त पद्धतीने उत्पादन करण्यासाठी कारखान्याचा परिसर भाड्याने घेतला होता. या प्रकरणात सूत्रधार असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश राज्यात डीआरआयने गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे ८  गुप्त औषधे उत्पादन युनिटस उद्धवस्त केले आहेत.

ज्यामुळे आंधप्रदेश राज्य सरकारच्या नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत ही मोहिम राबविण्यात आली आहे. आंधप्रदेश राज्यातील लोकांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक ड्रग्जच्या, बेकायदेशीर पदार्थांच्या, धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी डीआरआयने ही कडक कारवाई केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा