बीड – जिल्ह्यात अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणात आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या हिवरापाडी येथील अल्पवयीन विवाहितेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. बीडमध्ये हिवरापाडी गावामध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. तर घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. त्यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणात बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. हिवरापाडी गावातील आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले आहे. बीडमधील न्यायालयाने १७ मार्च २०२६ पर्यंत या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ११ मार्च रोजी पाडित महिला घरी झोपली असता गावातील वैभव पटेकर याने पीडितेला उचलून नेले होते. नदीकडील परिसरात नेऊन अत्याचार केला आहे.
घरातून नेताना पीडितेने विरोध केला असता, तिचे तोंड दाबून व धमकी देऊन तिला जबरदस्तीने नेण्यात आले. अत्याचारानंतर गावातील चावडीवर असलेल्या खांबाला बांधून तो आरोपी पळून गेला होता. हिवरापाडी गावातील या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो समोर आला आहे. हिवरापाडी गावचे सरपंच, गावातील ज्येष्ठ आणि कुटुंबातील सदस्य आल्यानंतरच या महिलेची खांबापासून सुटका करण्यात आल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार हिवरापाडीत घडला आहे. या घटनेनंतर पीडित विवाहित महिला प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिने पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली नाही.
त्यानंतर, कुटुंबीयांना ही घटना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर पीडित अल्पवयीन महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस पथकाकडून तपास केला जात आहे. परंतु या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणात अधिक तपास बीड पोलिस करत आहेत.





