मुंबई – देशात सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईचा परिणाम आता दूध व्यवसायावर होणार आहे. गॅस तुटवड्याचा दूध डेअरी उद्योगाला फटका बसणार आहे. असे दूध व्यावसायिकांनी सांगितले आहे. सध्या देशात सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईचा परिणाम आता दूध व्यवसायावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूध प्रक्रिया करण्यासाठी आणि पाश्चराईज्ड करण्यासाठी सतत इंधनाची गरज असते.
मात्र देशात गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे दूध डेअरी उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय दुधाच्या पिशव्या आणि पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक साहित्याचाही तुटवडा जाणवत आहे. देशात दूध व्यावसायासाठी लागणार्या पॅकेजिंग साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील अनेक दूध डेअरी मालकांनी सांगितले की, दूध पॅक करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या आणि कार्टन तयार करणाऱ्या उद्योगांनाही गॅस मिळत नसल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे.
त्यामुळे दुध डेअरी उद्योगात पॅकेजिंग साहित्याची कमतरता जाणवू लागली आहे. गोवर्धन दुध डेअरीचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी सांगितले की, सध्या दुधाच्या पिशव्या आणि कार्टन सहज उपलब्ध होत नाहीत. कारण ते तयार करणार्या कारखान्यांना गॅस मिळत नाही. आमच्याकडे सध्या केवळ दहा दिवस पुरेल इतकाच साठा उरला आहे. देशभरात दुधाची मागणी कमी पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठ्या ग्राहकांकडून दुधाची मागणी कमी झाली आहे.
देशातील अनेक हॉटेल्स बंद असल्यामुळे म्हशीचे आणि गाईचे दूध खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दूध डेअरींना दूध कमी दरात विकावे लागत आहे. मुंबईतीला चेंबूरमधील सुरेश दूध डेअरीचे व्यवस्थापक शरीब शेख यांनी सांगितले की, प्लास्टिक पिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुढील दहा दिवसांत दुध डेअरी उद्योगासमोर मोठे संकट निर्माण होऊ शकते. याशिवाय वाहतूक आणि उत्पादन खर्चही वाढला आहे.
दुधाचा आहे तो साठा विकण्याची वेळ आली आहे. बॉम्बे मिल्क प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी.के. सिंग यांनी सांगितले की, अलीकडे म्हशीच्या दुधाच्या तीन मोठ्या ऑर्डर्स रद्द झाल्या. त्यामुळे साठवलेले दूध बाजारात कमी दरात विकावे लागत आहे. छोट्या डेअरींकडे जास्त दूध साठवून ठेवण्याची सोय नसते, त्यामुळे त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होते. सणासुदीच्या दिवसांमध्ये देशातील दूध उत्पादनांवर परिणाम होत आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील श्री नारायण दुध डेअरीचे मालक यांनी सांगितले की, ते बासुंदी आणि श्रीखंडसारखे पदार्थ तयार करतात.
सण-उत्सव जवळ येत असल्यामुळे हा काळ त्यांच्या व्यवसायासाठी महत्त्वाचा असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मोठ्या दूध डेअरी कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. भारतातील काही मोठ्या दूध डेअरी कंपन्यांना येत्या काही दिवसात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मदर दूध डेअरीनेही सांगितले की, त्यांच्या दूध प्रक्रिया केंद्रांमध्ये पीएनजी आणि इतर इंधनांचा वापर केला जातो. एकूणच, एलपीजी गॅसची टंचाई कायम राहिली तर देशातील दूध डेअरी उद्योग अधिक संकटात येणार आहे.





