गोडाऊनमधुन गॅस सिलिंडर चोरी झाल्याचा प्रकार उघड; अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

SHARE:

जालना – जिल्ह्यात गोडाऊनमधुन गॅस सिलिंडर चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून ११० सिलिंडर चोरीला गेले आहेत. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये ११० गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आहे. आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडे चार लाखाहून अधिक किंमतीचे गॅस सिलिंडर चोरी केल्याने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चोरीस गेलेल्या सिलिंडरची किंमत साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. राज्यात एकीकडे नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर जालना जिल्ह्यात हा गॅस सिलिंडर चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी जालना शहरातील मौजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना पोलीसांच्या माहितीनुसार रविवारी गॅस एजन्सी बंद असताना रात्री ही चोरी झाली आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत जवळपास ९६ घरगुती सिलेंडर तसेच १२ व्यावसायिक सिलेंडर आणि ५ किलोचे २ व्यावसायिक सिलेंडर असे एकूण ११० गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत. ४  लाख ५१ रुपये किमतीचा हा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणात अधिक तपास जालना पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा