सरकारी अधिकारी आणि राजकीय लोक पमीगुरूला भेटण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; ठाणे जिल्ह्यात भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर

SHARE:

ठाणे – जिल्ह्यात भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर राज्यातील पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय लोक पमीगुरूला भेटण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंगावर करोडो रुपयांचे सोने महागड्या गाड्या व आलिशान जीवनशैली असलेला एका पमी गुरूचे प्रकरण आता समोर आले आहे. खासदारांसह पोलिसही पमीगुरूच्या दरबारी हजर राहत होते. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे हे या गुरूला भेटायला आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आता राज्यातील पोलिसांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. ठाणे जिल्ह्यात हा भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील राजकीय मंडळीसह पोलीस अधिकारीही अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा प्रकरण समोर आले आहे. पमी गुरू नावाच्या तृतीयपंथी भोंदूगुरूचे अजब दावे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंगावर करोडो रुपयांचे सोने घालून, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत पमी गुरू रील्स बनवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात पमी गुरू नावाच्या व्यक्तीचे व्हिडिओ व्हायरल आले आहेत. मुले होत नाहीत, नोकरीत कुटुंबात वाद या समस्येमुळे अनेक सुशिक्षित महिला महाराष्ट्रातून या पमीगुरूकडे येतात. आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मुले जन्माला आली असा दावा सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये करण्यात आला आहे. या पमीगुरूला भेटण्यासाठी पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय मंडळी देखील येत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा हे देखील या गुरूला भेटायला आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पमी गुरू सोशल मीडियावर करोडो रुपयांचे सोने, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत रील्स बनवत असल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. पमी गुरुची कोणीही तक्रार करत नाही त्याच्यापुढे स्थानिक पोलीस नतमस्तक आहेत, अशी परिसरात चर्चा आहे.

या पमी गुरुकडे ७ आलिशान गाड्या आहेत, फॉर्च्युनर कार ४ आहेत, त थार-३ आहेत, त्याचबरोबर पमी गुरुकडे मोठ्या प्रमाणावर सोने असल्याचे दिसून येत आहे. आता ठाणे जिल्ह्यातील पमी गुरु चर्चेत आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा