एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराचा प्रकार उघड; एसटी आगारप्रमुख सतीश तिडके यांची बदली

SHARE:

बीड – जिल्ह्यात एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराचा प्रकार उघड झाला आहे. बीडचे एसटी आगारप्रमुख सतीश तिडके यांची बदली करण्यात आली आहे. बीडजिल्ह्यातील एसटी महांमंडळाचे आगार व्यवस्थापक सतीश तिडके यांनी एका गुत्तेदाराकडून रोकड स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाने त्यांची बदली केली आहे. बीड जिल्ह्यातील एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.

या प्रकरणात बीड जिल्हा प्रशासनाने मोठी कडक कारवाई केली आहे. एका कंत्राटदाराकडून लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बीडचे एसटीआगार प्रमुख सतीश तिडके यांची बदली करण्यात आली आहे. या कडक कारवाईमुळे एसटी महामंडळात मोठी खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच्या बीड आगार प्रमुखांच्या दालनात चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवहाराचा भांडाफोड करण्यात आला आहे. बीड जिल्हा एसटी आगार व्यवस्थापक सतीश तिडके यांनी एका गुत्तेदाराकडून रोकड स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड प्रशासनाने त्यांची बदली केली आहे.

तिडके यांची रवानगी आता सहाय्यक यंत्र अभियंता कार्यशाळेत करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निलेश पवार यांची एसटी महामंडळाच्या बीड आगार प्रमुखांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. बीड बस स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम करणाऱ्या शेख नामक कंत्राटदारासोबत सतीश तिडके यांचा एक व्हिडिओव्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सतीश तिडके आपल्या कार्यालयातील टेबलावर बसून काही रक्कम स्वीकारताना आणि ती रक्कम मोबाईलखाली लपवताना स्पष्ट दिसत आहेत.

संबंधित कंत्राटदार ही रक्कम गिफ्ट असल्याचे सांगत आहे, तर सतीश तिडके असे गिफ्ट खूप झाले आहेत असे म्हणताना ऐकू येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश तिडके यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, त्यांनी ही रक्कम वैयक्तिक नसून चालक आणि वाहकांना सुविधा देण्यासाठी घेतल्याचा दावा केला आहे.

मात्र, सरकारी कार्यालयात अशा प्रकारे रोख रक्कम स्वीकारणे हे प्रशासकीय शिस्तीचा भंग आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एसटी महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापकांनी ही कडक कारवाई केली आहे. बीड जिल्हा एसटी आगारप्रमुख सतीश तिडके यांची बदली ही सुरुवात आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा