महागाईचा मोठा डोज, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत २८१ रुपयांची वाढ; आखतात सुरु असलेल्या युद्धाची झळ आता व्यवसायांवर

SHARE:

नवी दिल्ली – एकीकडे व्यावसायिक सिलेंडर मिळून राहिलेले नाही तर दुसरीकडे यात २१८ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे. या दरवाढीचा फटका धाबा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांना बसणार असून धाबा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधून खाद्य पदार्थ मागवणे महाग होणार आहे. आखतात सुरु असलेल्या युद्धाची झळ आता व्यवसायांवर आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. आधीच महागाई वाढली असताना आता या झळा आणखी तीव्र होणार आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, या दरवाढीनंतर आता कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडसाठी २१८ रुपये अधिक मोजावे लागतील. तर चेन्नईत २०३ रुपये, मुंबईत १९६ रुपये आणि दिल्लीत १९४ रुपये अधिक मोजावले लागतील. एका महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात झालेली ही तिसरी दरवाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

या दरवाढीनंतर, दिल्लीमध्ये, १  एप्रिलपासून १९-किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता २०७८.५० रुपये झाली आहे. यापूर्वी, याच सिलिंडरची किंमत १८८३ रुपये होती, म्हणजेच १९५.५० रुपयांची वाढ झाली होती. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत आजपासून २०१३ रुपयांपर्यंत वाढली आहे, जी पूर्वी १८३५  रुपये होती. म्हणजेच यात १९६  रुपयांची वाढ झाली आहे.

कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आजपासून २२०८ रुपयांपर्यंत वाढली आहे, जी पूर्वी १९९० रुपये होती. म्हणजेच येथे सिलेंडर २१८ रुपयांनी महाग झाला आहे. तर चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आजपासून २२४६.५० रुपयांपर्यंत वाढली आहे, जी पूर्वी २०४३.५० रुपये होती. म्हणजेच येथे २०४ रुपयांची वाढ झाली आहे.

पाटण्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा किंमत २३६५ रूपयांपर्यंत वाढली आहे, तर जयपूरमध्ये २०३१ रूपयांनी वाढली आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपयांनी कमी केले असले तरी याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना न मिळता पेट्रोलियम कंपन्यांना होणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा