मुंबई – आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पोलिस शिपायाने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यातील शिपाई किशोर म्हस्के यांनी घाटकोपर येथील राहत्या घरी ही घटना घडली आहे. पोलीस वसाहतीत ही घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वतःचे आयुष्य संपवले आहे.
मृत पोलील कर्मचाऱ्याचे नाव किशोर म्हस्के असे असून त्यांनी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर म्हस्के हे घाटकोपर शहरातील पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सरकारी पोलीस वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. मात्र मंगळवारी त्यांनी घरातच टोकाचे पाऊल उचलल्याचे उघडकीस आले आहे. नंतर या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. मात्र किशोर म्हस्के यांनी इतका मोठा निर्णय का घेतला? किंवा त्यांच्या आत्महत्येमागील कौटुंबिक वाद का कामाचा ताण की अन्य काही कारण आहे का, या सर्वांचा पोलीस तपास करत आहे. या घटनेत पोलिसांना कोणतहीही सुसाईड नोट सापडली नाही, त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नाही. याप्रकरणात अधिक तपास घाटकोपर पोलिस करत आहेत





