अल्पवयीन मुलीचा साधूवर बलात्काराचा आरोप, समाज माध्यमांत व्हिडिओ व्हायरल; ज्यूस मधे नशेचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप

SHARE:

उत्तर प्रदेश – काही वर्षांपूर्वी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते कि साधूच देशाला विश्वगुरू बनवू शकतात. मात्र याच साधूंवर बलात्काराचे आरोप लागत आहेत. यापूर्वी देखील साधूंवर असे आरोप लागले असून न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. आता यात आणखी एका साधूची एंट्री झाली आहे. उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीने एका साधूवर रेप केल्याचा आरोप लावला आहे. याचा व्हिडिओ समाज माध्यमांत वेगाने व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथील हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगी रडत आणि किंचाळत साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी अत्यंत घाबरलेली पाहायला मिळतेय. न्याय मिळावा म्हणून ती झोपून रस्ता अडवण्याचाही प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायाला मिळते.

आरोप असा आहे की साधूने तिला पिण्यासाठी ज्यूस दिला होता. त्या जूसमध्ये काहीतरी नशेचं औषध मिसळवलं. ज्यूस प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्याच अवस्थेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं तिचं म्हणणं आहे. तिने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांसमोर त्या साधूची ओळखही सांगितली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. यासोबतच सोशल मीडियावर आरोपीचा फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र दै.मूलनिवासी नायकने या व्हायरल व्हिडिओची पुष्टी केलेली नाही.

हा व्हायरल व्हिडिओ परिक्रमा मार्गाजवळील आहे. व्हिडिओमध्ये, अल्पवयीन मुलगी साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करत रडत आणि किंचाळत आहे. मुलीच्या या खळबळजनक आरोपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ सोमवारी फेसबुक आणि इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये, अल्पवयीन मुलगी साधूच्या वेशात असलेल्या एका वाटसरू व्यक्तीवर तिच्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत आहे. व्हिडिओसोबत आरोपी बाबाचा फोटोही जोडण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, आरोप करणारी मुलगी रस्त्यावर आडवी पडून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच मथुरा पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार जैंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. दरम्यान हा व्हिडीओ किती खरा आहे किंवा बनावटीचा आहे याची तपासणी सध्या सुरु आहे. मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रोसेस सुरू असून आरोपीची ओळख पटवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. हा व्हिडीओ सोसश मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावरही लोकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा