बुलढाणा – संग्रामपूर येथील शिक्षिका वृषाली गावंडे हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून सीबीआय तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्यात सुपारी देऊन शिक्षिका पत्नीची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. या गुन्ह्यात इतर आरोपीना पोलिसांनी अटक केलेली नाही. या कारणामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. व या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बुलढाण्यातील शिक्षिका वृषाली गावंडे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यानी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील वृषाली गावंडे या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका होत्या. २ मार्च २०२६ रोजी त्या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे शिक्षिका वृषाली गावंडे आपल्या दुचाकीने कामावर जात असताना एका चारचाकी मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिल्यामुळे अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यानंतर बुलढाण्यातील संग्रामपुर पोलिसांनी तपास करत शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या पतीनेच एका चार चाकी वाहन चालकाला 3 लाख रुपये सुपारी देऊन शिक्षिका वृषाली गावंडेची हत्या केली हे उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती, मित्र व वाहन चालक अशा तिघांना अटक केली आहे. मात्र या गुन्ह्यात सामील असलेले मृत शिक्षिका वृषाली गावंडेचे इतर नातेवाईकांना अद्यापही अटक झाली नाही. पोलीस त्यांना का अटक करत नाही? असा प्रश्न केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या बुलढाण्यातील शिक्षिका वृषाली गावंडे हत्या प्रकरणाचा संपुर्ण तपास सीबीआयकडे सोपवावा. व वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करून हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. अशी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनीच हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याची मागणी केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध संग्रामपुर तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेत मृत शिक्षिका वृषाली गावंडेच्या पतीने कट-कारस्थान रचून आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी बुलढाण्यात घडली होती. या घटनेत पतीने आपल्या पत्नीच्या अपघाताचा खोटा बहाणा केला होता. परंतु मृत शिक्षिका वृषाली गावंडेच्या पतीनेच सुपारी देऊन आपल्या पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे.





