सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी सरकारने दिलेली नाही, सत्यकी सावरकरांचा न्यायालयात खुलासा; काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्यात खुलासा देण्यात आला

SHARE:

पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल फौजदारी मानहानीच्या खटल्यातील तक्रारदार विनायक सावरकर यांचे पणतू सत्यकी सावरकर यांनी पुण्यातील विशेष खासदार/आमदार न्यायालयात साक्ष दिली की सावरकरांना कोणत्याही सरकारने ‘स्वतंत्रवीर’ ही पदवी दिलेली नाही. ही पदवी लेखक सदाशिव रानडे यांनी त्यांच्या चरित्रात दिली होती, असे त्यांनी सांगितले.

सत्यकी सावरकर यांनी न्यायालयाला सांगितले कि हे म्हणणे बरोबर आहे की सावरकरांना ‘स्वातंत्रवीर’ ही पदवी सरकारने दिली नव्हती. त्यांनी पुढे असेही सांगितले की जनतेने सावरकरांना ही पदवी दिली होती हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही दस्तऐवज नाहीत. सत्यकी म्हणाले की सदाशिव रानडे यांनी लिहिलेल्या चरित्रात सावरकरांना ‘स्वातंत्रवीर’ ही पदवी देण्यात आली आहे. रानडे यांनी दिलेली ही पदवी केवळ त्यांची कल्पना होती की नाही, हे मला माहीत नाही.

सत्यकी यांनी हेही मान्य केले की ब्रिटिश राजवटीत सावरकर शिक्षणासाठी लंडनला गेले होते आणि तिथे चार वर्षे राहिले होते. सावरकरांनी त्या काळात अनेक पुस्तके आणि लेख लिहिले होते आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे लक्ष टाळण्यासाठी यापैकी काही साहित्य टोपणनावांनी प्रकाशित करण्यात आले होते.

सावरकरांनी लिहिलेली अनेक पुस्तके वेगवेगळ्या लेखकांच्या नावांनी प्रकाशित झाली. सावरकरांची अनेक पुस्तके आणि इतर साहित्यकृती लंडनच्या ग्रंथालयांमध्ये आणि अभिलेखागारांमध्ये उपलब्ध आहेत. ब्रिटिशांचे लक्ष टाळण्यासाठी सावरकरांच्या साहित्यकृती दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने गुप्तपणे प्रकाशित करण्यात आल्या.

त्यांनी पुढे सांगितले की सावरकरांनी लिहिलेली अनेक पुस्तके,ज्यापैकी काही इतर लेखकांच्या नावांनी प्रकाशित झाली आहेत भारतात आणि लंडनमध्ये उपलब्ध असून विद्यार्थी आणि इतिहासकारांकडून त्यांचा अभ्यास केला जात आहे. मात्र ते या पुस्तकांमधील मजकूर उघड करू शकत नाहीत. किती पुस्तके आहेत, ती कोणत्या प्रकारची आहेत किंवा त्यांची संख्या किती आहे, हे मी सांगू शकत नाही. मी एक लेखक आहे, इतिहासकार नाही. लंडनमधील लेखक, इतिहासकार आणि विद्यार्थ्यांनी सावरकरांविषयी काय लिहिले आहे, याची मला माहिती नाही.

आरोप आहे की राहूल गांधींनी तीन वर्षांपूर्वी यूकेमध्ये आयोजित ओव्हरसीज काँग्रेसच्या कार्यक्रमात सावरकरांविरुद्ध वक्तव्ये केली. सत्यकी यांचा दावा आहे की राहूल गांधींनी सावरकरांवर एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याचे वर्णन करणारे पुस्तक लिहिल्याचा आरोप केला. हा दावा खोटा असून अशी कोणतीही घटना घडली नाही. तक्रारदाराने पुरावा म्हणून वृत्तपत्रांतील बातम्या आणि गांधींच्या भाषणाची यूट्यूब लिंक सादर केली आहे. सत्यकी यांनी आयपीसीच्या कलम ५०० अंतर्गत राहूल गांधींना शिक्षा व्हावी आणि सीआरपीसीच्या कलम ३५७ अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. १६  एप्रिल रोजी उलटतपासणी सुरू राहील.

Leave a Comment

अधिक वाचा