युद्धाचे सावट पुन्हा गडद झाल्याने सराफा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे, थेट सोन्याच्या भावावर परिणाम….

SHARE:

व्यवसाय : इराण-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव वाढला असून, याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर स्पष्ट दिसत आहे. दिल्ली, मुंबईसह प्रमुख भारतीय शहरांतील ताजे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती जाणून घेऊया. आज १० ग्रॅम सोनं..

पाकिस्नाच्या इस्लामाबादमध्ये इराण-अमेरिकेत झालेली शांतात चर्चा निष्फळ ठरली असून आता जगावर पुन्हा युद्धाचं सावट घोंगावायला लागलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्य ट्रम्पनी होर्मुजच्या सामुद्रधुनीच्या नाकाबंदीचे आदेश दिले असून इराणविरोधात ते आक्रमक भूमिका लवकरच घेऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या या घडामोडींचे सर्वच क्षेत्रात पडसाद उमटत असून आता सोन्या-चांदीच्या दरांवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशात सोन्याची किंमत घसरलेली पहायला मिळाली आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजी सकाळी राजाधनानी दिल्लीत २४ क2रेट सोन्याचे दर १,५२,९८०  रुपये प्रति १०  ग्रॅम आहेत तर मुबीत हाच दर १,५२,८३०रुपये आहे.आज जरी दर कोसळला असला तरी गेल्या आठवड्याभरात २४ कॅरेट सोनं हे १९१० रुपयांनी महागलं आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १७५०  रुपयांनी वाढल्याचं दिसून आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ४,७७७.१७ डॉलर्स इतका आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५२,९८० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४०,२४० रुपये इतका आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि कोलकाता येथे २४ कॅरेटचं १  तोळे, म्हणजेच १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी १ लाख ५२ हजार ८३० रुपये आणि २२ कॅरेटचं १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी १  लाख ४० हजार ०९० रुपये मोजावे लागणार आहेत.

चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ५४ हजार १०० रुपये इतकी असूनन २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमसाठी    १,४१,२६० रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे आणि बंगळूरू या दोन्ही शहरांमध्ये, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,८३० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४०,०९० रुपये आहे. एकूण पहायला गेलं तर देशात चेन्नईत सोनं सर्वाधिक महाग असल्याचं दिसून येत आहे.

चांदीचे दर

सोन्याच्या भावात उलथापालथ झालेली असतानाच आज १३ एप्रिल रोजी चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घट झाली आहे. आज सकाळी चांदी १  किलोची किंमत ही २,५९,९००रुपयांपर्यंत घसरली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत १० हजार रुपयांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस ७५.९१ आहे. या वर्षी जानेवारीमध्ये भारतात चांदीच्या किमतीने ४  लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तेव्हा चांदी प्रचंड महागली होती. मात्र आता चांदीच्या दरात चढउतार कायम असून उच्चांकापेक्षा ती बरीच खाली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा