नोकरीचे आमिष दाखवून भोंदूबाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार; महिलेची ५० लाखाची फसवणुक

SHARE:

पुणे – नोकरीचे आमिष दाखवून भोंदूबाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे, तर या प्रकरणात एका महिलेची ५० लाखाची फसवणुक करण्यात आली आहे. पुण्यातील पीडित महिला पतीपासून वेगळी राहत होती. वादावर तोडगा काढण्याचा व नोकरीचे आमिष दाखवनू एका भोंदूबाबाने हा धक्कादायक प्रकार केला आहे. आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचा बनाव करणार्या या आरोपी भोंदूबाबाने महिलेला ५० लाख ५५ हजार रुपयांना लुटले आहे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आणि नोकरीचे आमिष दाखवून एका ४२ वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोरा आली आहे. या प्रकरणी भोंदूबाबाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. अंगात दैवी शक्ती असल्याचा बनाव करणार्या या नराधमाने महिलेला फसवल्याचे तपासात समोर आले आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचे पती कौटुंबिक वादामुळे वेगळे राहत होते. ५ वर्षांपूर्वी या महिलेची भेट भोंदूबाबा औदुंबर मनोहर गडदे रा. तरटगाव, पंढरपूर याच्यासोबत झाली होती. आपण देवऋषी असल्याचे सांगून गडदे याने महिलेला जाळ्यात ओढले आहे.

स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून पहिल्यांदा महिलेवर अत्याचार केला आहे. त्यानंतर लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव या ठिकाणी नेऊनही त्याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. शारीरिक अत्याचार व या भोंदूबाबा औदुंबर गडदे याने आर्थिक फसवणूक ही केली आहे. त्याने पीडित महिलेला बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले आहे. मे २०२१ पासून त्याने रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात पीडित महिलेकडून एकूण ५० लाख ५५ हजार रुपये घेतले आहेत. आपली फसवणूक आणि शोषण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने ११ एप्रिल २०२६ रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

या घटनेबाबत ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेचे आपल्या पतीसोबत पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ते दोघेही वेगळे राहत होते. महिलेची ५ वर्षांपूर्वी भोंदूबाबा औदुंबर गडदे याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा भोंदूबाबा औदुंबर गडदे याने देवऋषी असून माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी केली होती. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला फसवले आहे. त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून अत्याचार केला आहे. पुण्यात या भोंदूबाबाच्या अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अधिक तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा