नाशिक – अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांकडून सर्व बेकायदेशीर मालमत्तांची मोजणी सुरू आहे, तर अशोक खरातने लोकांची फसवणूक करून कोट्यावधी रूपये मिळवल्याचे उघडकीस आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ईशानेश्वर मंदिर, कार्यालय ते मोठा फार्महाऊस अशा सर्व अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या कारवाईनंतर आता ईडीने या प्रकरणात कारवाई करणार आहे. ईडीने अशोक खरातच्या विविध मालमत्तांची तपासणी सुरू केली आहे.
माहितीनुसार, अशोक खरातच्या बेकायदेशीर संपत्तीचा शोध घेण्यासाठी ईडीच्या पथकाने एसआयटी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत आहे. यामध्ये नाशिकमधील ईशानेश्वर मंदिर, अशोक खरातचे कार्यालय, मोठा फार्म हाऊससह विविध ठिकाणच्या जमिनीच्या भूखंडांची पाहणी ईडीकडून करण्यात आली आहे. तपास यंत्रणांकडून सध्या भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांची मोजणी सुरू आहे. अशोक खरातने घेतलेल्या जमिनी व मालमत्ता यांचे सध्याचे बाजारमूल्य किती आहे, याचा अंदाज घेतला जात आहे.
अशोक खरातने एवढी मोठी मालमत्ता कोणत्या उद्देशाने जमा केली आहे. आणि काही मालमत्तांमध्ये जोडीदार का घेतले आहेत? याचा तपास ईडीकडून केला जात आहे. अशोक खरातच्या जमिन व मालमत्ता व्यवहारांमध्ये मनी लाँड्रिंग झाले असण्याची शक्यता आहे. अशोक खरातची बँक खाती सील करण्यात आली आहे. त्यातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, एसआयटी भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. भोंदू अशोक खरातवर दाखल असलेल्या चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी, यासाठी तपास यंत्रणा न्यायालयाकडे विनंती करण्याची शक्यता आहे. अशोक खरातने भोंदूगिरीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे. व कोट्यावधी रूपये मिळवले आहेत. अशोक ख्रातचे सर्व कारनामे व मोठ्या आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे आता समोर येत आहेत. ईडीने तपास चालू केल्यामुळे या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक एसआयटी पथक व ईडी करत आहे.





