नाशिक – खरातच्या कोट्यावधींच्या बेनामी व्यवहारांचे पुरावे सापडले आहेत, तर फसवणूक व खंडणीतून कमावलेला पैसा जमिनींमध्ये गुंतवल्याचे उघडकीस आले आहे. भोंदू अशोक खरातवर ईडी आणि इन्कम टॅक्सने कडक कारवाई केली आहे. अशोक खरातच्या घरात बेनामी व्यवहारांच्या कच्च्या नोंदी सापडल्या आहेत. मनी लाँड्रिंगबाबत मोठा खुलासा झाला आहे. अशोक खरातच्या घरात टाकलेल्या धाडीत मालमत्ताच्या कच्च्या नोंदी आढळल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाने खरातच्या घरावर टाकलेल्या धाडीत कोट्यावधींच्या बेनामी व्यवहारांचे पुरावे हाती लागले आहेत.
फसवणूक आणि खंडणीतून कमावलेला पैसा जमिनींमध्ये गुंतवून अशोक खरातने मोठी आर्थिक कमाई केली असल्याचे तपासात समोर आले आहे. कच्च्या नोंदणी व्यवहारातून भोंदू खरातचे बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. तपासात अशोक खरातच्या घरात मालमत्तेच्या कच्च्या नोंदी असलेली कागदपत्रे सापडली आहेत. शासकीय नोंदणी न करता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मालमत्तांचे व्यवहार करून अशोक खरातने अनेक जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. करचोरी करण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी मालमत्तांची अधिकृत नोंदणी न करता केवळ कच्च्या पावत्यांवर हा व्यवहार सुरू होता.
अशोक खरातच्या घरावर ईडी व इन्कमटॅक्सच्या धाडीमध्ये तपास यंत्रणांनी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मनी लाँड्रिंगसाठी काही शेल कंपन्यांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. अशोक खरात विरोधात आता तपास यंत्रणांना अनेक पुरावे मिळाले आहेत. शेल कंपन्या, बनावट व्यवहार आणि नोंद न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे, बँक खाते, सीडीआर आणि आयकर रिटर्नची तपास यंत्रणांकडून पडताळणी सुरु आहे. त्यामुळे अशोक खरात विरोधात आता मनी लाँड्रिंगचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
अशोक खरातच्या पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अशोक खरातवर विविध गुन्हे दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. तर, त्याच्या पत्नीवरही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. कल्पना खरात अद्याप फरार आहे. न्यायालयात कल्पना खरात हिच्या अटकपूर्वक जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. परंतु पुन्हा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता पुढील सुनावणी आता २२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.
आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असताना देखील वकिलांच्या विनंतीवरुन ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. मूळ फिर्यादीच्या विनंतीनंतर न्यायालयाकडून ही वाढीव मुदत देण्यात आली आहे. आता अशोक खरात प्रकरणात त्याच्या पत्नीचा शोध नाशिक एसआयटी पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक एसआयटी पोलिस करत आहेत.





