मुंबई – ज्या राज्यांमध्ये स्वतःची एक संस्कृती, भाषा, लिपी आहे अशा राज्यांचे हिंदीकरण करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून सुरु आहे, असा गंभीर आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केला आहे. महिला आरक्षणाला विरोध नाही, तर लोकसभा मतदारसंघांच्या होणार्या पुनर्रचनेला विरोध आहे, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना महिला आरक्षण विधेयक याच्या मार्फत स्वतःकडे सत्ता कशी राहील याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपची महत्त्वाकांक्षा आहे. लोकसभेत सुरू असलेल्या महिला आरक्षण विधेयकांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मात्र, महिला आरक्षणाच्या आडून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी केली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, भाजपच्या महत्त्वाकांक्षेला आमचा विरोध आहे. केंद्रातील भाजपा सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना महिला आरक्षण विधेयका मार्फत लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्यातून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे, असे दाखवले गेले आहे. या विधेयकावर चर्चा सुरु असताना अचानक केंद्रातील भाजपा सरकारने घोषित केले की २०२३ चे महिला आरक्षण विधेयक लागू झाले आहे. जर यातील विधेयक बदलांवर चर्चा सुरु आहे तर मग केंद्रातील भाजपा सरकारला घाई कसली? केंद्रातील भाजपा सरकारला नक्की काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
देशातील महिला आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही, आमचा विरोध हा लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघांच्या होणाऱ्या पुनर्रचनेला आहे. घटनेतील कलम ८१ आणि ८२ सांगतात की, लोकसभेतील जागा राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटल्या जातील. देशात महाराष्ट्रासह इतर राज्यांचे हिंदीकरण करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकारकडून चालला आहे. ज्या राज्यांमध्ये स्वतःची एक संस्कृती, भाषा, लिपी आहे अशा राज्यांचे हिंदीकरण करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून सुरु आहे. त्यात पुन्हा भाजपा सरकार मतदारसंघांची पुनर्रचना निष्पक्षपणे करतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.
मतदारसंघ फोडणे या विषयांत भाजपा सरकार पुढे आहे. देशात कुठल्याही आयोगाकडे निष्पक्षता आहे का? हा देश हे एक संघराज्य आहे. महाराष्ट्राने आत्ताच हिंदी सक्तीच्या नावाखाली देशातील भाजपा सरकारने काय काय प्रकार केले हे सगळ्या महाराष्ट्रानी पाहिले आहे. उद्या या वाढलेल्या खासदारांच्या जोरावर भाजपा सरकार संपूर्ण देशाचे हिंदीकरण करतील. ही भीती आहे. आणि म्हणूनच दक्षिणेतील राज्य भाजपा सरकारच्या विरोधात एकवटली आहेत. भारतीय जनता पक्ष हा गेली 10 वर्षे देशातील अनेक राज्यातील छोटे-मोठे पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता.
गेली काही वर्षे हाच भाजपा पक्ष देशातील मोठ्या राजकीय घराण्यामध्ये फूट पाडत होता. देशात जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली तरूण पोरांची माथी भडकवत होता. पण आता भाजपा सरकार सरळ देशात दोन गट पाडण्याच्या प्रयत्नात आहे. स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे. भाजपा सरकार हा देश तोडायला निघाला आहे. देशात काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीने काय रक्तरंजित संघर्ष उभा केला होता. देशात अशी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार असणार आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.
ज्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाने राजकारण करता आणि मते मागता, त्या वल्लभभाईं पटेलांना हा देश एकत्र आणताना काय संघर्ष करावा लागला होता. हा इतिहास भाजपच्या लक्षात नाही. लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या वाढवा. पण सध्याचा राज्यांचा जो कोटा आहे त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. देशात लोकसंख्येनुसार जागांचे वाटप करा. सध्या केंद्रातील भाजपा सरकार जे करत आहे तो एक प्रकारे आगीशी खेळ खेळत आहेत. लोकसभा हा आकड्यांचा आखाडा बनवून त्यांना सत्तेत रहायचे आहे.
पण भाजपा सरकारच्या चुकीच्या राजकारणामुळे या देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे ठामपणे भाजपा सरकारच्या विरोधात लढा देत आहेत. देशाची राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकारकडून होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला आरक्षणाला पाठींबा आहे. पण जे काही हिंदीचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून सुरु आहे त्याला आमचा स्पष्ट विरोध आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे, असे मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत.




