कोविड लसीबद्दल एलॉन मस्क यांचा मोठा दावा; दुसऱ्या डोसनंतर मरणासन्न झाल्यासारखे वाटले

SHARE:

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध अब्जाधीश एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा कोविड-१९ लसीच्या सुरक्षिततेबद्दल जागतिक चर्चेला सुरुवात केली आहे. एलॉन मस्क म्हणाले की त्यांना कोविड-१९ चा मूळ वुहान स्ट्रेन सामान्य सर्दीसारखा वाटला, पण लसीच्या दुसऱ्या डोसनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. १२ एप्रिल, २०२६ रोजीच्या एका पोस्टमध्ये मस्क यांनी दावा केला आहे की लसीच्या दुसऱ्या डोसनंतर त्यांना मरणासन्न झाल्यासारखे वाटले. त्यांच्या या पोस्टने जगभरात कोविड वैक्सीनवरून चर्चा सुरू झाली आहे.

एलॉन मस्क यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात, त्यांनी कोविड-१९ लसीबद्दल प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले मला आधीच मूळ वुहान व्हेरिएंटची लागण झाली होती, जो सामान्य सर्दीसारखा होता. हा संसर्ग वाईट होता, पण तितका धोकादायक नव्हता. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर, माझी प्रकृती इतकी खालावली की मला वाटले मी मरेन. मला रुग्णालयात जावेच लागेल असे वाटले. मस्कने दावा केला की लसीचा डोस स्पष्टपणे गरजेपेक्षा जास्त होता आणि तो आवश्यकतेपेक्षा अधिक वेळा दिला गेला.

स्वीडिश पत्रकार पीटर इमॅन्युएलसेन यांनी या मुलाखतीचा हवाला देत प्रश्न उपस्थित केल्यावर जर्मनीमध्ये हा मुद्दा समोर आला. पीटरने विचारले की इतका महत्त्वाचा मुद्दा मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये का हाताळला जात नाही. पीटरने स्पष्ट केले की, जर्मन संसदीय चौकशीदरम्यान, डॉ. स्टर्झ यांनी दावा केला होता की कोविड लसींमुळे (विशेषतः फायझरच्या एमआरएनए लसीमुळे) जर्मनीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यांनी असेही म्हटले होते की या लसीला कधीही मंजुरी द्यायला नको होती, कारण १० आवश्यक प्रीक्लिनिकल सुरक्षा अभ्यास वगळण्यात आले होते. मात्र, या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळणी झालेली नाही आणि वैज्ञानिक समुदायामध्ये यावर तीव्र मतभेद आहेत.

एलॉन मस्क आपला अनुभव शेअर करताना म्हाणले कि दुसऱ्या बूस्टर डोसनंतर त्यांना तीव्र शारीरिक त्रास जाणवला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आपला हा त्रास उघड केला. मस्कच्या पोस्टमुळे लसीची सुरक्षितता, एमआरएनए तंत्रज्ञान आणि महामारी धोरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मस्कने यापूर्वी सक्तीच्या लसीकरणाला विरोध केला होता.

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या निधनानंतर चार वर्षांनी, त्यांचा मुलगा जॅक्सनने दावा केला आहे की, कामावर असताना त्यांना सक्तीने घ्याव्या लागलेल्या तीन-चार कोविड लसींमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा. २०२२ मध्ये थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने शेन वॉर्न यांचे निधन झाले. ‘टू वर्ल्ड्स कोलाइड’ पॉडकास्टवर बोलताना जॅक्सन म्हणाला की वॉर्नच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर फोन ठेवताच माझी पहिली प्रतिक्रिया सरकारला दोष देण्याची होती. मी तात्काळ कोविड लसीला दोष दिला.

माहित असावे कि दोन वर्षांपूर्वी ॲस्ट्राझेनेकाने यूके उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये टीटीएस सारखे दुर्मिळ दुष्परिणाम मान्य केले होते. थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि त्यामुळे पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर कोरोना काळात जगभरातील लोकांना लस पुरवणाऱ्या ॲस्ट्राझेनेकाने आपली कोविड-१९ लस परत मागवली होती.

विशेष म्हणजे, ॲस्ट्राझेनेकाची कोविशील्ड लस भारतात अनेकांना देण्यात आली होती. ही लस भारतीय कंपनी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने, ॲस्ट्राझेनेकाकडून परवाना घेऊन भारतात तयार केली. ही लस घेतल्यानंतर मेंदूला इजा झालेल्या जेमी स्कॉट यांनी ॲस्ट्राझेनेका विरुद्ध खटला दाखल केला होता. अनेक कुटुंबांनीही या लसीच्या दुष्परिणामांबद्दल न्यायालयात तक्रार केली होती. यावर सुनावणी दरम्यान ॲस्ट्राझेनेकाने यूके उच्च न्यायालयात मान्य केले कि लसीमुळे टीटीएस सारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात.

Leave a Comment

अधिक वाचा