राज्यातील महामार्गांवर टोल वसुलीमध्ये अनेक गैरप्रकार केल्याचा प्रकार उघड; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही होणार, महामार्ग प्रशासनाचा इशारा

SHARE:

मुंबई – राज्यातील महामार्गांवर टोल वसुलीमध्ये अनेक गैरप्रकार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी फास्टॅगमध्ये फेरफार करण्यात आला आहे. महामार्गातील टोल वसुलीत फेरफार करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे, असे राज्यातील महामार्ग प्रशासनाने म्हटले आहे. भारतातील अनेक महामार्गांवर टोल वसुली सुलभ करण्यासाठी फास्टॅग चा वापर केला जातो. इंधनाची बचत, वेळेची बचत, आणि पद्धतशीर टोलची वसुलीसुद्धा, याच टोलवसुलीमध्ये अनेक लोक गडबड करून पैसे वाचवत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्यातील काही वाहनचालक पैसे वाचवण्यासाठी फास्टॅगच्या स्कॅनर मध्ये बिघाड वा बदल करत आहेत. ही गोष्ट पटकन कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक गैरप्रकार टोल वसुलीद्वारे केले जात आहेत. काचेवर स्कॅनर न चिटकवणे, अनेक वाहनांवर, काचेवर फास्टॅग नसतो. तो हातात धरून किंवा प्लॅस्टिकमध्ये असतो, त्यामुळे टोल वसुली करणाऱ्यांना तो टॅग कोणत्या गाडीचा आहे यावर त्यांची चटकन नजर जात नाही. कारसाठी असलेला फास्टॅग मोठ्या वाहनांवर म्हणेजच ट्रक किंवा बस वर चिटकवून कमी टोल भरण्याचा प्रयत्न केला जातो.

कॅमेऱा स्कॅन करू शकणार नाही अशा पद्धतीने टॅगवर सेलोटेप किंवा इतर काहीतरी लावले जाते, जेणेकरून तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन कमी तोल भरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने फास्टॅगचे नियम कडक केलें आहेत. राज्यातील महामार्गावर टोल वसुली चुकवणार्यांना किंवा काही कारण सांगून टोल कमी करायला लावणार असल्यास त्यांना आता दुप्पट दंड ठोठावण्याचा कायदा नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने केला आहे.

जर फास्टॅग स्कॅन झाला नाही किंवा त्यात काही फेरफार आढळला तर नियमानुसार चालकाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो. आणि असे वारंवार घडल्यास तुमचा फास्टॅग हा कायमचा बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे योग्य टोल भरणे आणि फास्टॅगची व्यवस्थित काळजी घेणे ही जबाबदारी आहे ,असे राज्यातील महामार्ग प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा