जळगाव – एक लाखांची लाच घेताना एसीबीकडून पोलिसाला अटक करण्यात आली आहे, तर या प्रकरणात पोलिस कर्मचारी विनोद अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे. जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर कडक कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहराचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ही कडक कारवाई केली आहे. जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशन लाचखोरी प्रकरणी पोलिस कर्मचार्याला निलंबित करण्यात आले आहे. तर जळगाव शहरातील पोलिस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
जळगाव शहरात तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेताना पोलीस ठाण्याच्या आवारातच विनोद अहिरे या कर्मचाऱ्याला एसीबीच्या पथकाने अटक केली होती. या प्रकरणात अहवाल प्राप्त होताच संबंधित पोलीस कर्मचार्यांवर निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कारवाईबाबतचे आदेश काढले आहेत. दाखल तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी आरोपीकडून १ लाख रुपयांची लाच घेताना पकडलेल्या पोलिस कर्मचारी विनोद अहिरे यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. एसीबीने जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच ही कडक कारवाई केली होती.
या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिस कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
या प्रकरणात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. १३ एप्रिल २०२६ रोजी एससीबीकडून सापळा रचला होता. पडताळणीत पोलिस असलेल्या आरोपीने पंचासमक्ष १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार, १ लाख रुपयांची लाच घेत असताना एसीबीच्या पथकाने पोलिस कर्मचार्याला अटक केली.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. जळगाव शहरात एसीबीकडून नागरिकांना आवाहन केले आहे की, जळगाव शहरात कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तक्रार करावी.
भ्रष्टाचाराविरोधात अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा एसीबीने दिला आहे. जळगाव शहरात तक्रार चौकशीची जबाबदारी पोलिस कर्मचार्याकडे देणे, पोलिस कर्मचार्यावर लक्ष न ठेवणे आणि कामातील निष्काळजीपणा यांमुळे जळगाव शहरातील पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची बदली करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी विनोद अहिरे यांच्याविरोधात यापूर्वीही गंभीर तक्रारी असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे पोलिस दलातील कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्यात आल्याचे जळगाव शहरातील पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी म्हटले आहे. या प्रकरणात अधिक तपास जळगाव पोलिस करत आहेत.





