पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित

SHARE:

पुणे – पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे जमीन घोटाळ्यातील शीतल तेजवानीला जामीन मिळाला आहे, तर उच्च न्यायालयाकडून पुण्यातील बावधन पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंढवा जमीन घोटाळ्यातील शीतल तेजवानीला जामीन मिळाल्यामुळे बावधन पोलिसांचा चुकांमुळे तुरुंगातून सुटली आहे, व पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा नडला आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पुण्यातील बावधन पोलिसांनी अटक करण्यापुर्वी पूर्तता करताना चुक केली आहे.

पुण्यातील बावधन पोलिसांनी हे जाणीवपूर्वक केल्याची चर्चा आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला जामीन मिळाला आहे. बावधन पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाला आहे. बावधन पोलिसांनी अटकेपूर्वीच्या पूर्तता पूर्ण करताना कुचराई केली आहे. पोलिसांनी हे जाणीवपूर्वक केल्याची चर्चा रंगलेली आहे. पुणे पोलिसांकडून मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी ताबा घेताना अटकेचे कारण दिले नाही. आणि पिंपरीतील सेवा विकास बँकेच्या प्रकरणी २ तास आधी अटकेबाबत कळवले नाही. याच कारणांवरून उच्च न्यायालयाने पुण्यातील बावधन पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुणे पोलीस असा हजलगर्जीपणा करुच कसे शकते? हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. सुरुवातीपासूनच पुणे पोलिसांच्या या जमीन घोटाळा प्रकरणातील भूमिकेवर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. अशातच शीतल तेजवानीला जामीन मिळावा म्हणून पोलिसांनी या चुका केल्या आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुण्यातील बावधन पोलिसांच्या या २ गुन्ह्यात शीतल तेजवानीला जामीन मिळणार आहे. दुसरीकडे पुणे पोलिसांच्या प्रकरणात मात्र शीतल तेजवानीच्या जामीनावरून पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा