​९ गोळ्या अन् रक्ताचा सडा! भाजप कार्यकर्त्याच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह?

SHARE:

पुणे – शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांदरम्यान मावळ तालुक्यातील देहू रोड येथे धक्कादायक गोळीबाराची घटना घडली आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश रेड्डी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्लेखोरांनी तब्बल नऊ राऊंड गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने ते जागीच कोसळले.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती समजताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठा आक्रोश व्यक्त केला. काही काळासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत नागरिकांची समजूत काढली.

यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेनंतर देहूरोड बाजारपेठेतील अनेक दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Leave a Comment

अधिक वाचा