रियान परागवर व्हेपिंग प्रकरणी ॲक्शन, त्याला किती मॅचेससाठी बॅन?

SHARE:

खेळ – क्रिकेटपटू हे युवा पिढीचे आदर्श असतात. मात्र असंख्य चाहत्यांचा आदर्श असलेल्या रियान पराग याला आपण काय करतोय आणि कुठे करतोय याचा विसर पडला. रियानने व्हेपिंग केलं. त्यामुळे रियानवर काय कारवाई करण्यात आली? जाणून घ्या.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याचा काही दिवसांआधी ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग (Riyan Parag Veping) करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. राजस्थान ने मंगळवारी २८ एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या १९ व्या मोसमातील ४० व्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवत पंजाबचा विजयरथ रोखला होता. रियानचा या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग करतानाचा काही सेकंदांचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे रियानवर कारवाई होणार हे निश्चित होतं. मात्र रियानवर काय कारवाई होणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून होती. रियानवर काही सामन्यांसाठी बंदीची कारवाई करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र तसं काही झालेलं नाही. रियानवर करण्यात आलेली कारवाई पाहता क्रिकेटर स्वस्तात सुटला, असं म्हटलं जात आहे. रियानवर व्हेपिंग प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे रियानवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

रियानवर अशी कारवाई
रियानची व्हेपिंग प्रकरणात स्वस्तात सुटका झाली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रियानला एकूण सामन्याच्या मानधनापैकी 25 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागली आहे. तसेच रियानला त्याने केलेल्या कृतीसाठी १ डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. व्हेपिंग प्रकरणी दंडात्मक कारवाई होणारा रियान पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा