17 वर्षांनी अटक केलेला आरोपी न्यायालय परिसरातून फरार; या प्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

SHARE:

ठाणे – वसईमधे 17 वर्षांनी अटक केलेला आरोपी न्यायालय परिसरातून फरार झाला आहे, तर या प्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कोणताही गुन्हा घडताच प्रत्येकजण हा पोलिसांवर विश्वास ठेवून न्यायाची वाट पाहत असतो. मात्र वसईत न्यायालय आवारात पोलिसांच्या कोठडीतून आरोपी पळाला आहे. वसई न्यायालय परिसरात घडलेल्या एका घटनेने राज्यातील पोलीस यंत्रणेतच मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीच्या पळण्यामागे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यानंतर ठाण्यातील तपास यंत्रणांनी कडक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वसई येथील न्यायालयाच्या परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणी सध्या 3 आरोपींना अटक केली आहे. 2009 मध्ये विनोद जैस्वाल हत्या या प्रकरणात अविनाश सोनी याला 17 वर्षानंतर 2025 मध्ये अटक करण्यात आली होती. आणि तो अटक झाल्यानंतर ठाणे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. सोमवारी 18 मे 2026 रोजी त्याला पुढील सुनावणीसाठी ठाणे कारागृहातून वसई येथील सत्र न्यायालयात आणण्यात आले होते.

वसई न्यायालय परिसरात आल्यावर आरोपीने शौचालयाला जाण्याची परवानगी मागितली. आणि त्याच वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला शौचालयात नेले. पण काही वेळातच हा आरोपी तेथून फरार झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील वसई न्यायालय परिसरात एक गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर वसई पोलीस ठाण्यात आरोपी हा पोलिस ठाण्याच्या कोठडीतून फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतर ठाणे पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास केला. आणि या तपासात 3 पोलिसांवर संशय आला.

वसई पोलिसांनीच आरोपीच्या हातामध्ये असलेल्या बेड्या काढूनच त्याला मुद्दाम पळून जाण्यास मदत केली, असे तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणी एकनाथ तळपाडे, प्रशांत राठोड, वसीम शेख या 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 3 पोलीस कर्मचाऱ्यांना आता अटक करण्यात आलेली आहे.
पोलिसांशिवाय या प्रकरणात आरोपीची पत्नी साक्षी सोनी आणि मुलगा अतुल याला ही अटक करण्यात आली आहे. कारण यांनी आरोपीला फरार होण्यासाठी मदत केल्याचा संशय ठाणे पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. मात्र फरार असलेला आरोपी अविनाश सोनी याचा शोध घेण्यासाठी ठाणे पालिसांनी विशेष पथके तयार केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा