नवी दिल्ली – देशातील 10 राज्यातील २४ जागांसाठी राज्यसभा निवडणूका जाहीर झाल्या आहे, तर कार्यकाळ संपलेल्या 24 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलेे आहे. देशातील निवडणूक आयोगाने 10 राज्यातील 24 जागांसाठी आणि 2 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. देशातील राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जून आणि जुलै 2026 मध्ये कार्यकाळ संपत असलेल्या 24 सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी हे मतदान घेतले जाणार आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी प्रधानमंत्री एच. डी. देवेगौडा आणि दिग्विजय सिंह यांच्यासारख्या देशातील नेत्यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या 2 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे. तर, तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकचे सी. षण्मुगनम यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक होईल. सुनेत्रा पवार यांच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीतील सदस्याचा कार्यकाळ हा 4 जुलै 2028 पर्यंत असणार आहे. देशात आंध्रप्रदेश गुजरात, कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि मिझोराम या 10 राज्यांमधील जागांचा यात समावेश आहे.
यात सर्वाधिक 4-4 जागा आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमधून रिक्त होत आहेत. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून प्रत्येकी 3 जागा, झारखंडमधून 2 जागा आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराममधून प्रत्येकी 1 जागा रिक्त होत आहे.
देशातील प्रमुख राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी प्रधानमंत्री एच. डी. देवेगौडा यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय राजस्थान राज्यातील राजेंद्र गेहलोत, नीरज डांगी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्या जागा रिक्त होणार आहेत. या राजकीय नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. या राज्यसभेच्या जागा जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता लवकरच देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






