बीड – जिल्ह्यात आग लागल्यामूळे शेतकर्याची 4 एकर केळीची बाग जळून खाक झाली आहे, तर यामूळे शेतकर्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील मोहखेड येथे 4 एकर केळीच्या बागेला आग लागल्याची ही घटना घडली आहे. या आगीमुळे संपूर्ण केळीची बाग जळून खाक झाली आहे. बीडच्या मोहखेड येथे काही दिवसात शेतकर्याच्या 4 एकर बागेतील केळी बाजारात पाठवली जाणार होती. मात्र अचानक लागलेल्या आगीत 4 एकर बागेतील साडेपाच हजार केळीचे झाडे जळाली आहेत.
त्यामुळे आधीच संकटात असलेल्या केळी उत्पादक शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकर्याच्या शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग संपूर्ण केळीच्या बागेमध्ये पसरली. यावेळी आजुबाजुच्या शेतकरी बांधवांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग लागल्याने आटोक्यात आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. बीड जिल्हा प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी रणधीर सोळंके यांनी केली आहे.
एकाच वेळी शेतकऱ्याची 4 एकर केळीची संपूर्ण बाग जळून खाक झाल्ली आहे. केळीच्या बागेला आग लागल्यामूळे शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास हिसकावून घेतला आहे. मोठा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसला आहे.
बीड जिल्ह्यातील मोहखेड इथे ही भीषण आगीची घटना घडली आहे. आग विझवण्याकरता परिसरातील शेतकरी लोकांनी खुप प्रयत्न केले आहेत. परंतू, ही आग इतकी भीषण होती की या आगीमुळे शेतकर्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकरी कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






