अकोला – जिल्ह्यात एका पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तर याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील गजानन सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा घोटाळा समोर आला आहे. या घटनेत आरोपी पिता-पुत्र दोघांना अटक केली आहे. अकोल्यातील याप्रकरणात गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. अकोल्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पिता-पुत्र दोघांना अटक करण्यात आली आहे.
या पतसंस्थेत गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे. अकोल्यातील गजानन सहकारी पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी पिता-पुत्र असलेल्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. या पतसंस्थेत 8 कोटी 97 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. अकोल्यातील गजानन पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणात अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यात 8 कोटी 97 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अकोला शहरातील डाबकी रोड पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अकोला शहरातील आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे परत देणे बंद केले होते. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त केला आहे.
अकोला शहरातील नोकरदार, पेन्शनर, कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांसह 2,500 ठेवीदारांचे पैसे या पतसंस्थेत अडकले आहेत. या पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा करून हा पैसा इतर ठिकाणी गुंतवल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला होता. अनेक तक्रारीनंतर अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
अकोल्यातील गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांची संख्या 2500 इतकी आहे. या पतसंस्थेतील ठेवींची रक्कम 25 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती मिळाली आहे. या पतसंस्थेतून ठेवीदारांचे पैसे देणे एप्रिलपासून बंद करण्यात आले आहे. या पतसंस्थेच्या अकोल्यात 2 आणि तेल्हाऱ्यात एक शाखा आहेत. या घटनेचा अधिक तपास अकोला पोलिस करत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






