हवामान बदलाचा कांद्याला फटका: नाशिकमध्ये १५० क्विंटल कांदा सडला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

SHARE:

नाशिक – हवामान बदलामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिकमध्ये 150 क्विंटल कांदा सडल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये शेतकर्याला 150 क्विंटल कांदा उकिरड्यावर टाकण्याची वेळ आली आहे. राज्यात हवामान बदल व उष्णतेमुळे साठवणुकीतील कांदा खराब झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हवामानातील बदलाचा फटका बसल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.

येवला तालुक्यातील पारेगाव येथे कांदा चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याची घटना समोर आली आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱी बांधवांनी पुढे चार पैसे जास्तीचे मिळतील या आशेने कांदा साठवला होता. मात्र आता तोच कांदा कुजल्याने शेतकऱी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. येवला तालुक्यषतील पारेगाव येथील शेतकरी शरद खिल्लारे यांचा 150 क्विंटल अतिउष्णतेमुळे पूर्णपणे सडला आहे.

मे महिन्यातील तीव्र उष्णतेचा फटका चाळीतील साठवणुकीच्या कांद्याला बसला आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे कांदा चाळीतच शिजून गेल्यासारखा झाला आहे. तर कांद्यावर मोठ्या प्रमाणात बुरशी तयार झाली आहे. हा सडलेला कांदा आता बाजारात विक्रीयोग्य राहिला नाही. त्यामुळे नाशिकमधील शेतकऱी बांधवांना हा कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकरी बांधव उन्हाळी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतात.

पावसाळ्यात जसे भाव वाढतील, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने हा कांदा बाजारात विकला जातो. यातून मिळणाऱ्या भांडवलावरच शेतकऱी बांधवांचे पुढील पिकांचे आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, यावर्षी साठवणूक केल्यानंतर महिना-दीड महिन्यातच बदललेल्या हवामानाचा आणि वाढत्या उष्णतेचा फटका शेतकरी बांधवांच्या साठवणुकीतील कांद्याला बसला आहे. त्यामुळे पुढील पिकांच्या भांडवलाचा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

राज्यातील शेतकरी बांधवांच्या कांदा पिकाला योग्य भाव मिळावा आणि निर्यातबंदी उठवावी या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यात मोठे शेतकरी आंदोलन करण्यात आले होते. कांद्याचा प्रश्न आधीच पेटलेला असताना, आता चाळीत साठवलेल्या कांद्याच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी बांधव खचला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून राज्य शासनाने नाशिक जिल्ह्यातील कांदा चाळींचे पंचनामे करावेत. आणि साठवलेल्या कांद्याच्या नुकसानीसाठी आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱी बांधवांनी केली आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा