शेगाव (बुलढाणा) – नुकताच राज्यात पोलीस पाटील यांच्या हितासाठी लढणारी कार्यरत पोलीस पाटील यांची एकमेव अधिकृत संघटनेचा राज्य स्तरीय मेळावा संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदकिशोर हिवसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटक माजी अध्यक्ष मुरकुटे आबा पाटील, संस्थापक सचिव दिलीप जाधव हे होते.
मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक राज्य कार्याध्यक्ष राहूल उके पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती राज्य उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड पाटील, राज्य सहसचिव अशोक गेडाम पाटील, संघटन सचिव कमलेश धोटे पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्हाध्यक्ष अकोला राजेंद्र चनेकर पाटील,वाशिम जिल्हाध्यक्ष मंगेश सरनाईक पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य सुजयदादा देशमुख,बुलढाणा जिल्हाध्यक्ष राम पाटील सपकाळ होते.
या मेळाव्यात राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील ज्ञानोबा मुंडे पाटील व भगवान घुगे पाटील यांचा उपस्थित पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संघटनेचे कायदेशीर सल्लागार विधी तज्ञ श्रीपाद कुलकर्णी, चार्टर्ड अकाऊंट तुषार आगासे यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.
पोलीस पाटील यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असुन ते प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस पाटील यांनी संघटीत होऊन एकजुटीने असोसिएशनला पाठबळ देणे गरजेचे असून संघटना शासन दरबारी योग्य पाठपुरावा करून वयोमर्यादा वाढ,पोलीस पाटील पदभरती, मानधन वाढ सह इतर सर्व मागण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राज्य अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मत व्यक्त केले.

यावेळी मंचावर विदर्भ अध्यक्ष प्रदिप मोहतुरे पाटील, मराठवाडा अध्यक्ष गजानन मोरे पाटील, राज्य कोषाध्यक्ष धोंडीबा राऊत पाटील, वर्धा जिल्हाध्यक्ष विश्वेश्वर लांबट पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष दिगंबर कदम पाटील,सचिव रामदास चव्हाण पाटील, हिंगोली जिल्हाध्यक्ष यादव कुंभकर्ण पाटील, जालना जिल्हाध्यक्ष भिवाजी तायडे पाटील, अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकरराव लोखंडे पाटील, विदर्भ महासचिव प्रा.टि.बी.रामटेके, विदर्भ उपाध्यक्ष निलाकांत पुसदेकर, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष कैलास डवले पाटील, नितीन गोरले पाटील, श्रीनिवास तायडे पाटील,अकोला महिला जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे पाटील,शुंभागी देशमुख,प्रतिभा कुकडे,अरुणा चव्हाण,रुपाली धोतरकर,शिला जाधव,सुवर्णा कोगदे, कविता धाकटे,शितल भोजने,शारदा देवघरे,वंदना दिघडे,मोहीनी भंडारे,मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष मोहन ,सदार पाटील, संतोष माकडे पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मुंकद कोशेट्टीवार,आशिष पाटील लोंदे,कस्तुरबा सर्वोदय संस्था सचिव कुणाल पटवर्धन,वाशिम जिल्हा उपाध्यक्ष माणिक बेंद्रे पाटील,वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष निनाद बोंदरे पाटील सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संस्थापक सचिव दिलीप जाधव यांनी वर्धा धर्मदाय कार्यालय येथुन नोंदणीकृत असोशिएशन ची राज्य कार्यकारणी घोषित केली व अधिकृत कागदपत्रे उपस्थित पोलीस पाटील यांना दाखविण्यात आली. राज्यभरातुन बहुसंख्य पोलीस पाटील यांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शविली.
सुत्र संचालन डॉ.वैभव निमकर व आभार प्रदर्शन बुलढाणा जिल्हाध्यक्ष राम पाटील सपकाळ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोला जिल्ह्यातील पोलीस पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






