नागपूर – अमृत योजनेच्या नावाखाली शहरातील रस्त्यांची झालेली अक्षरशात चालन आणि प्रशासनाच्या अनागोंदी विरोधात अखेर महापौर नेता ठाकरे यांनी रौद्ररूप धारण केले. ‘नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना बेधडक दंड ठोठावा आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करा’ असे खडे बोल सुनावत महापुरांनी मनपाच्या आमसभेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अमृत योजनेच्या कामात प्रचंड निष्काळजीपणा दिसून येत असून महापालिका आयुक्तांनी स्वतः यावर प्रत्यक्ष लक्ष ठेवावे, अशी कडक तंबीही त्यांनी दिली. समाज माध्यमातून सातत्याने रस्त्यांच्या केलेल्या पोलखोलचे पडसाद सभेत उमटले.
सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या झोनमधील कामांवर बारकाईने नजर ठेवावी, जिथे गरज भासेल तिथे कंत्राट दाराला दंडवत ठोठावावा आणि रस्ते तातडीने पूर्ववत दुरुस्त करावेत. विशेष म्हणजे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या व त्यांना गांभीर्याने न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा भडगाव उभारला जाईल, असा इशारा देत महापोरांनी आठ दिवसांच्या आत खड्डेमय रस्ते सुधारण्याचे आदेश दिले. सोमवारी मनपाचे आमसभेत स्थगन प्रस्तावा द्वारे नगरसेवक अभिजीत छाया यांनी अमृत योजनेतील रस्ते दुरुस्तीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. विशेष म्हणजे, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंचे नगरसेवक एकत्र आलेले दिसून आले. मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत हे काम केले जात असून अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी या विभागाच्या प्रमुख आहेत. महापौर ठाकरे पुढे म्हणाल्या की, अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते दुरुस्तीसाठी एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली पाहिजे. रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी निश्चित काल मर्यादा ठरवली जावी जेणेकरून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी छायाचित्रे आणि ठिकाणासह आलेल्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात. अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे कानाडोळा केला किंवा चुकीची माहिती दिली तर कडक कारवाई होईल.
स्तगन प्रस्ताव मांडताना काय म्हणाले अभिजीत झा?
स्थगन प्रस्ताव मांडताना अभिजीत झा यांनी आरोप केला की, अमृत योजनेसाठी खोदलेले रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे बुजवले गेले आहेत, ज्यामुळे वाहने घसरत असून नियमितपणे अपघात होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी छायाचित्रे आणि लोकेशनसह संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. झा यांनी ‘दादा रामधाम ते रवी नगर’ आणि ‘सीपी क्लब ते मदर डेअरी’ या रस्त्यांचा विशेष उल्लेख केला, जिथे दोन ते तीन महिने काम बंद होते. दुरुस्तीनंतरही त्या रस्त्यांची अवस्था दयनीयचं असल्याचा दावा त्यांनी केला.
अमृत योजनेवरून पक्ष विपक्ष एकमतात
सत्तापक्ष – सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी आरोप केला की, अमृत योजनेचे कंत्राट मिळविणारे मुख्य ठेकेदार आपले काम छोट्या कंत्राटदारांना (सह-कंत्राटदार) वाटून देत आहेत. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर आणि देखरेखीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा कंत्राटदारांना बोलावून फैलावर घेतले पाहिजे.
विरोधी पक्ष – विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी आरोप केला की, विभागाच्या प्रमुखांना प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांची साधी माहिती ही नव्हती. अमृत 2.0 याचा सविस्तर प्रकल्प अहवाल थेट गुगल मॅप चा वापर करून तयार करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. सदोष नियोजन आणि अंमलबजावणी मुळेच नागरिकांना अतोनात मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






