वितीवढेसे पोट l केवढा बोभाटा तयाचा ll
आयुष्यातील प्रखर सत्य जीवनानुभव देतात. त्याने माणसे घडत जातात. जीवनावर त्याचा परिणाम होतो. चांगला विचार करणारे शाश्वत सत्याचा मार्ग निवडतात. शाश्वत कीर्तीचा विचार करतात. समाजापुढे आदर्श ठेवतात.
तुकारामाचा भाग्योदय झाला, पण फार काळ टिकला नाही. दैवाची लहर फिरली नि तुकारामाच्या उभ्या आयुष्याचे चित्र पालटले. तुकारामाच्या कुटुंबावर एकामागून एक येणाऱ्या सततच्या संकटामुळे परिस्थिती विपरीत झाली. नि तुकारामाच्या संसाराची घडी पार विस्कटून गेली.
केवळ वयाच्या १७ वय वर्षी प्रथम तुकारामांचे वडील वोल्होबा मरण पावले. त्यानंतर लगेच आई वारली. आई बाप निवर्तल्यावर थोड्याच दिवसात भावजय हे जग सोडून गेली. पत्नीच्या निधनामुळे तुकारामांचे वडील बंधू सावजी संसाराला विटले आणि तिर्थटना ला णिघुन गेले. घरी सावकारी असून एकामागून एक घरात घडून येणाऱ्या दुर्दैवी प्रसंगामुळे तुकारामांचे वडिलोपार्जित व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आणि चांगला जम बसलेला व्यवसाय पूर्णपणे बुडाला. तुकारामांचे व्यवसाय वरील लक्ष पूर्णपणे उडाले.
तुकारामांची आर्थिक परिस्तिथी खालावत चालली. एवढ्यावरच परिस्थिती थांबली नाही तर परिस्थितीने नियतीच्या साथीने तुकारामाचा पुरता सुड घेण्याचे ठरवले दिसत होते. त्याच कालावधीत म्हणजे शके १५५१-५२ म्हणजेच सं १६२९-३० मध्ये महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. महाराष्ट्रात जनतेचे खाण्याचे हाल झाले. भरभराटीच्या काळात तुकरमाकडे जी काही साठलेली थोडीबहुत पुंजी जमा झाली होती, तिच्या भरवश्यावर तुकारामाच्या कुटुंबीयांनी कसे बसे दिवस काढले. कोणत्याही प्रयत्नाने परिस्थिती सुधारत नव्हती. ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रतिष्ठेच्या सर्व कल्पना गुंडाळून ठेवून चरितार्थासाठी तुकारामाचा लोकांपुढे हात पसरण्याची वेळ आली.
वितीएवढे पोट l केवढा बोभाटा तयाचा ll जळो याची विटंबना l भूक जना नाचवी ll
सर्व महाराष्ट्रापुढे भुकेचा प्रश्न होता. आयुष्यातील अशा प्रखर सत्याचा स्वानुभव तुकारामांनी घेतला. अंनाधांन्य पिकले नाही. म्हणून दुष्काळ पडला. अन्नधान्य टंचाईमुळे अन्नांन करून लोक प्राण सोडू लागले. दुष्काळाचा परिणाम तुकारामाच्या आयुष्यावर झाला. तुकारामांची आर्थिक ओढाताण सुरू झाली. संसाराची घडी नीट बसेना. ज्यांच्याकडून येणे होते, ते देणे मगतचा तोंड फिरवू लागले. कर्जाचे ओझे आणि संसाराचे बोझे वाढू लागले. तुकारामांची सावकारी तर पुरती बुडाली नापिकी झाली. दुकानदारी वसली आणि दिवाळे निघाले.
या दुष्काळाच्या काळात अन्न ना मिळाल्याने तुकारामांची आजारी असलेली पहिली बायको रखुमा बाई आणि मुलगा संतोष दोघेही मरण पावले. तुकारामाचा पहिला प्रपंच दुष्काळाच्या आपत्तीने अशाप्रकारे संपला. हे दुःख तुकारामाच्या जिव्हारी लागले. ह्या दुःखाचा त्यांना जबरदस्त तडाखा बसला. ‘न भूतो, न भविष्यती’ असे दुष्काळाचे भयावह स्वरूप तुकारामांनी पाहिले. अप्त स्वकियांसहित अनेक लोकांना डोळ्यादेखत मारताना पाहिले. ह्या अस्मानी संकतासोबत सुलतानी संकट डबा धरून बसले होते. ते अधून मधून डोके वर काढत होते. मुसलमानी शासकांमुळे वारंवार युद्धे होत असत, वरचेवर चकमकी झडत असत. देहूच्या आसपासचा प्रदेश दहशतीखाली होताच. दुष्काळामुळे आधीच अंनांन दशा झाली. शेती पिकली नाही. दोन वर्षे पाऊस झाला नाही. झाडाचा पाला खाऊन लोक जगात होती. लोकांचे शेती व्यवसाय बुडाले. त्यातच ही परपिडा जनतेला छळू लागली. स्वतःच्या संसाराची आणि व्यवसायाची धूळधाण झालेली त्यांनी अनुभवली. सर्वत्र अस्मानी आणि सुलतानी संकट धाहकर मानवाला होता.
सभोवतालचे सततचे दुःख दैन्य, पहुंतुकरमचा जीव कासावीस होत होता लोकांचे दैन्य त्यांना बघवेना.
खरे तर पोट वितभरच पण त्याच्यासाठीच तो जगण्याचा खटाटोप करतो. एकूणच जगाचा पसारा पाहता मनुष्याच्या संसाराचे स्वरूप किती छोटे पण ह्या छोट्याश्या जगतातील संसारात येणाऱ्या संकटांचे स्वरूप परवतासारखे महाकाय दिसते आणि दुःख महसगरासारखे अफाट अथांग आहे. हे सारे अनुभव घेऊन ते अस्वस्थ झाले. संसार तापाने चीतीत झाले दुष्काळाने मरणाऱ्या लोकांची मधी पाहून मानवाच्या क्षणभंगुर जीवनाची प्रचिती आली. क्षुद्र जीवन बद्दलची अनास्था त्यांच्या मनात रुजली. जीवनाची क्षणभंगुरता त्यांनी जाणली. लोकांचे दुःख,दैन्य हतबलता बघून त्यांच्या मुळच्याच कनवाळू, दयाळू, प्रेमळ, स्वभावाच्या अंतरातम्यात संत प्रवृत्ती जागी झाली आणि पाहता पाहता तुकारामाच्या हृदयातच तिने कायमचे घर केले.
क्रमशः –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
साहित्यिक तथा कवी, अमरावती.
मो. – 9423279432
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






