छत्रपती संभाजी नगर येथे एका मुलाच्या आयफोन च्या हट्टापायी झालेलीदुर्दैवी घटना आणि त्यामुळे उध्वस्थ झालेले कुटुंब यासर्व परिस्थिती वर श्री. हेरंब कुलकर्णी यांनी मांडलेले आपले मत वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत…
आयफोन….
आय फोन चे हट्टासाठी झालेला तरुण व त्याच्या आईवडिलांचा मृत्यू सर्वांनाच हळहळ व्यक्त करायला लावत आहे..यात त्या मुलाला किंवा पालकांना दोषी न ठरवता एकूणच पालकत्व आणि प्रश्न यावर बोलायला हवे
यात पुढील काही मुद्दे आहेत..
१) ओशो रजनीश म्हणतात की मुलांना एकदा नाही म्हणालात तर त्यावर काहीही झाले तरी ठाम राहा..त्यांनी आग्रह धरल्यावर जर तुम्ही वाकलात तर पुढील वेळी ते तुम्हाला पुन्हा वाकवतात. तुम्ही वाकू शकता हे त्यांना त्यातून लक्षात येते.त्यामुळे लहानपणी अशी मानसिकता मुलांची तयार करा..अन्यथा ते टोकाला जाऊन तुम्हाला वाकवत राहतील..या तरुणाने मागील वर्षीही आत्महत्या करण्याचा याच ठिकाणी प्रयत्न केला होता..हे लक्षणीय आहे. त्याला पालकांचा अंदाज यातून आला.
२) या कुटुंबात एक मुलगा अपघातात गेला..त्यामुळे नकळत या मुलांबाबत पालक हळवे झाले. एकच मूल असलेले कुटुंब या एक वेगळ्या समस्या झाल्या आहेत. आपण लहानपणी
एकत्र कुटुंबात होतो. एका घरात जास्त मुले मुली असायचे. त्यामुळे मुलांना स्वतंत्र वागणूक नसायची. बिस्कीट पुडा आणला तरी प्रत्येकाला एक दोन बिस्कीट यायचे. दिवाळीत फटाका लड सोडून ४/५ फटाके वाटले जायचे. फळे आणली तरी कापून. स्वतंत्र बेड रूम नसायची. एका रांगेत झोपायचे. एकच मूल या व्यवस्थेत ते मूल व्यक्तिवादी अहंकारी होते. हे जग आपल्या भोगासाठी निर्माण झाले आहे अशी त्याची मानसिकता होते..या कुटुंबाच्या समस्या यातून दिसत आहे. ती समस्या तुमच्या माझ्या घरातही आहे.
३) नवीन जीवनशैलीचे प्रश्न फक्त श्रीमंत किंवा शहरापुरते नाहीत हे ही यातून दिसते आहे. खालचा आर्थिक स्तर वरच्या आर्थिक स्तराचे अनुकरण करतो. त्यातून मान्यतेच्या या फूट पट्ट्या पूर्ण करण्याचे हा वर्ग अनुकरण करतो. आयफोन हे त्याचे इथे फक्त प्रतिक आहे. त्यामुळे या मुलाला गुन्हेगार ठरवण्यात अर्थनाही.. हा प्रश्न गरीब ड्रायव्हर असलेल्या कुटुंबातही दिसतो आहे..त्यामुळे हे प्रश्न गरीब श्रीमंत असे नाही तर सर्व समूहाचे आहेत..त्या दृष्टीने प्रबोधनाची दिशा ठरवायला हवी.
४) पालकांना कोणतेच पालकत्वाचे प्रशिक्षण नाही हा ही मुद्दा लक्षात घ्यायला हवा..आपल्या देशात पालक होण्यासाठी कोणतीच पदवी लागत नाहीत. साधी गाडी चालवायला लायसन लागते पण पालक होण्यासाठी कोणतीच अट नाही. पालकत्व हे काही शहरी फॅड नाही .. तो अगदी गरीब कुटुंबालाही लागू आहे
लेखक –
हेरंब कुलकर्णी,
छत्रपती संभाजी नगर.
(स्रोत – मीडिया वॉच पब्लिकेशन)
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






