गिट्टीखदान पोलिसांची धडक कारवाई : घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या ६ आरोपींसह एक विधिसंघर्षग्रस्त बालक जेरबंद

SHARE:

नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरामध्ये रात्रीच्या वेळी धाडसी दरोडा टाकणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

घटनेची पार्श्वभूमी : दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास, फ्रेड्र्स कॉलनी येथील फिर्यादी सौम्या सुब्रमण्यम पालुरु (वय ३८) व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा घरी झोपले असताना, ४-५ अनोळखी इसमांनी घरात प्रवेश केला. आरोपींनी त्यांना बंदूक व चाकुचा धाक दाखवून मारहाण केली आणि घरातील दोन मोबाईल फोन (किंमत अंदाजे ६०,००० रुपये) हिसकावून नेले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

तपास व अटक : घटना अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न केले.

अटक करण्यात आलेले आरोपी :

   १. सुमेद उर्फ छोटा राजकुमार सोमकुवर (वय ३२)

   २. आकाश संजय मेश्राम (वय ३१)

   ३. भूषण संजय अलोने (वय १८)

   ४. निखिल प्रफुल दुबे (वय २०)

   ५. पियुष धनराज गोस्वामी (वय १९)

   ६. शेख तौहीद उर्फ येडाभाई शेख फारुख (वय २०) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक

मुख्य आरोपी हा फिर्यादीच्या पतीच्या कार्यालयात चार वर्षांपासून ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि त्यानेच घरची माहिती देऊन इतर साथीदारांसोबत मिळून हा कट रचला होता. आरोपींकडून मोबाईल, खेळण्यातील काळी बंदूक आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २,६०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा